Wednesday, November 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेटफळगडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधसाठ्यावर डल्ला; वैद्यकीय अधिकाऱ्याविरोधात चोरीचा गुन्हा

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 18 November 2026, 17:00

भिगवण : शेटफळगडे (ता. इंदापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील शासकीय औषधसाठ्यातून औषधे आणि साहित्य चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी त्याच आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याविरोधात भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित वैद्यकीय अधिकारी औषधांची पिशवी भरून दुचाकीवरून नेताना दिसत असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

याप्रकरणी शेटफळगडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल सुरेश थोरात यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, डॉ. स्नेहल राजेंद्र कारंडे यांच्याविरोधात शासकीय औषधसाठ्यातील औषधे कोणतीही नोंद न करता आणि वरिष्ठांची परवानगी न घेता नेल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, औषधनिर्माण अधिकारी मनिषा बिसेन यांनी औषधसाठा तपासला असता मोठ्या प्रमाणात औषधे कमी असल्याचे त्यांच्या निदर्शनास 3 नोव्हेंबर रोजी सकाळी आली. त्यानंतर आरोग्य केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये रात्रीच्या पाळीवर असलेल्या डॉ. कारंडे या औषधांच्या खोलीतून पिवळ्या रंगाच्या डिस्पोजेबल पिशवीत गोळ्या व औषधे भरताना आणि त्यानंतर ती पिशवी दुचाकीवरून घेऊन जाताना दिसत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

तसेच, 2 नोव्हेंबर रोजी रात्री डॉ. कारंडे यांनी त्यांच्या आजारी आई-वडिलांसाठी औषधे घेण्याबाबत औषधनिर्माण अधिकाऱ्यांना फोन केला होता. त्यावेळी रजिस्टरमध्ये नोंद करून औषधे घेण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी तपासणी केली असता औषध वितरणाची कोणतीही नोंद आढळली नाही. औषधसाठ्याची पडताळणी केली असता सलाईन, मधुमेहावरील गोळ्या, प्रतिजैविके, ताप व वेदनाशामक औषधे, जीवनसत्त्वांच्या गोळ्या, ओआरएस पाकिटे, इंजेक्शन आणि पल्स ऑक्सिमीटर अशा एकूण 17 प्रकारच्या औषधे व साहित्याची कमतरता आढळली. त्यांची एकूण किंमत 4 हजार 57 रुपये 70 पैसे असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकाराची तालुका वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना लेखी माहिती देण्यात आली होती. त्यानंतर खातेअंतर्गत चौकशी करण्यात आली. चौकशीअंती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी कायदेशीर तक्रार दाखल करण्यासाठी डॉ. थोरात यांना प्राधिकृत केले. त्यानुसार त्यांनी भिगवण पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई अपेक्षित आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शायना एनसींच्या कृतीने वाद पेटला! बाळासाहेबांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री शिंदें मैदानात, शिवसैनिकांना स्पष्ट सांगितले…

Wednesday, 18 November 2026, 18:27

आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी ४९ लाखांची मदत; मुख्यमंत्री सहायता निधीकडे धनादेश सुपूर्द

Wednesday, 18 November 2026, 18:09

बारामतीत दोन स्वतंत्र जातीय अत्याचाराच्या घटना; वकील महिलेसह बहिणीला मारहाण, ऑक्सिजन कंपनीत तोडफोड

Wednesday, 18 November 2026, 18:03

पुण्यात चोरट्यांचा एटीएमवर डल्ला! सीसीटीव्हीवर कलर स्प्रे मारून 20 लाख 30 हजारांची रोकड लंपास; पोलिसांसमोर मोठं आव्हान…

Wednesday, 18 November 2026, 18:03

३०० चौरस फुटांचा छोटासा व्यवसाय ते १० देशांत विस्तार; पुण्याच्या उद्योजकांची यशोगाथा राष्ट्रीय पातळीवर

Wednesday, 18 November 2026, 17:16

लाडक्या बहिणींनो सावधान! e-KYC च्या नावाखाली खातं रिकामं करण्याचा डाव; प्रशासनाचा मोठा इशारा..

Wednesday, 18 November 2026, 17:13
Next Post

लाडक्या बहिणींनो सावधान! e-KYC च्या नावाखाली खातं रिकामं करण्याचा डाव; प्रशासनाचा मोठा इशारा..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp