मुंबई : मनोज जरांगे पाटील कोणत्या व्यक्तीला आमदार बनायचं स्वप्न दिलं आहे त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. जरांगे पाटलांच्या नातेवाईकांकडे कसे काय 45 डंपर आले, याची चौकशी करण्यासाठी मी ईडीकडे जाणार असल्याचे अजय बारसकर यांनी म्हटलं आहे. मी उद्या त्यांच्याविरोधात सकाळी ११ वाजता बाॅम्ब टाकणार असल्याचे ते म्हणाले. अजय बारसकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच मागच्या दोन महिन्यापासून त्यांनी बंद दाराआड बैठका घेण्यास सुरुवात केल्याचही आरोप बारसकर यांनी केला.
ते पुढे बोलताना म्हणाले की, मी महाराज सोबत वकील पण आहे. माझ्याकडे त्यांचा पुरावा असून माझ्याकडे मनोज जरांगेंची रेकॉर्डिंग आहे. आज मी मनोज दादा बोलत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी लोणावळ्यामध्ये बंद दाराआड का मीटिंग घेतली? असा मी प्रश्न विचारला. बंद दाराआड तुमची काय डील झाली? १४ तारखेला जी सभा झाली त्यामध्ये जरांगे पाटील यांनी ६ मागण्या केल्या होत्या. त्या सभेमध्ये तुम्ही समाजाची मागणी मान्य केली. लोणावळ्यात बंद दाराआड बैठक झाल्यानंतर सरसकट शब्द सोडून दिले. अंतरवली मागणीमध्ये ज्या ४५ बांधवांनी आत्महत्या केली त्यांच्यासाठी सरकारी नोकरी का सुटली? अशी विचारणा त्यांनी केली.
मनोज जरांगे पाटील याची २०१७ मध्ये काय मागणी होती ते अजय बारसकर यांनी दाखवत ओबीसीपेक्षा वेगळ्या आरक्षणची मागणी जरांगे पाटील यांची होती. मात्र, आता बदलला आणि कुणबी दाखला पाहिजे. जरांगे यांनी आरोप केला त्या महिलेला आणा, असेही ते म्हणाले. मनोज जरांगेंवर पुण्यामध्ये फसवणुकीची केस आहे. जरांगे बोलतात मी ट्रॅप आहे, ट्रॅप कोणावर होतो जो काळा धंदा करतो. ते काळा धंदा करतात का? ज्या पिटीशनमुळे गायकवाड कमिटीचा आरक्षण आले ते माझ्यामुळे आले. उद्या ११ वाजता इथे बॉम्ब स्पॉट होणार आहे. जरांगे कसा आहे, त्याबद्दल बॉम्ब फोडणार आहे, असं बारसकर म्हणाले.
मी मराठा समाजासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. मराठवाड्यात कुणबी शोधण्यासाठी मी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होतो. त्यामुळे मधल्या काळात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी जोडलो गेलो. पण जरांगे पाटील यांच्यासह काम करताना त्यांची हेकेखोर वृत्ती हळूहळू समजू लागली. सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये मी जरांगे पाटील यांना मसूदा वाचून त्यातील बारकावे लक्षात आणून देण्याचे काम करत होतो, असही कीर्तनकार अजय बारसकर म्हणाले.