मुंबई: बँकॉकवरुन आणलेलं तब्बल पावणे 7 किलो वजनाचं सोनं मुंबई विमानताळावरून अमंलबजावणी व सक्तवसुली संचालनालयाने जप्त केले आहे. बँकॉकहून मुंबईला जाणारे विमान TG 317 ने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला सोने तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास अमंलबजावणी व सक्तवसुली संचालनालयाचे अधिकारी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बँकॉकहून मुंबईला जाणारे विमान TG 317 यातील एका प्रवाशाची अंगझडती केली असता एका प्रवाशाने घातलेल्या बुटात 14 सोन्याचे बार ठेवलेले आढळले. त्याच्याकडे सापडलेल्या सोन्याचे एकूण वजन 6735.42 ग्रॅम एवढे होते. या सोन्याची साधारण किंमत 6.30 कोटी रुपये एवढी आहे. तस्करी करून आणलेले सोने जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर प्रवाशाला सीमाशुल्क कायदा, 1962 च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली. याबाबबतचा अधिक तपास अमंलबजावणी व सक्तवसुली संचालनालय करीत आहे.