मुंबई : मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. घरी सोडण्याच्या बहाण्याने ६४ वर्षीय महिलेचे अपहरण करून तिच्यावर एकाने बलात्कार केल्याची घटना मानखुर्द येथे घडली आहे. एवढंच नाही तर आरोपीनं महिलेला जबर मारहाण देखील केली आहे. याप्रकरणी 38 वर्षीय आरोपी उमेश ढोक (वय ३८) याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, पीडित महिला मासे विक्रीचा व्यवसाय करते. सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ती घरी जात असताना रस्त्यात तिला उमेश ढोक हा आरोपी भेटला. दुचाकीवरून घरी सोडण्याच्या बहाण्याने आरोपीने तिला मानखुर्द महाराष्ट्र नगर येथील त्याच्या राहत्या घरी नेले. या ठिकाणी आरोपीनं तिला एका खोलीत डांबून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला रात्रभर जबर मारहाण करत पहाटे ५ च्या सुमारास घराबाहेर सोडलं.
गंभीर अवस्थेत असलेल्या महिलेला काही नागरिकांनी एका रुग्णालयात दाखल करत ट्रॉम्बे पोलिसांना याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी महिलेला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले असून महिलेच्या जवाबवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत मंगळवारी या आरोपीला अटक केली.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 367, 367 (2) (N), 325, 323 आणि 504 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या या महिलेची प्रकृती चिंताजक असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
Maharashtra | A 38-year-old accused Umesh Gulabrao was arrested for allegedly raping & assaulting a 64-year-old woman at his residence. The police registered a case against the accused under sections 376, 376 (2) (n), 325, 323 and 504 of the Indian Penal Code. The woman’s…
— ANI (@ANI) December 20, 2023