एका ठराविक वयानंतर मुलांमध्ये मुलींचे आणि मुलींमध्ये मुलांचे आकर्षण हे दिसून येते. त्यानंतर रिलेशनशिपही तयार होते. या रिलेशनशिपमध्ये ‘रेड फ्लॅग’ हा शब्द वापरला जातो. ‘रेड फ्लॅग’ हे असे लोक आहेत जे त्यांच्या स्वभावानुसार, आपल्या नातेसंबंधासाठी धोकादायक किंवा हानिकारक ठरू शकतात.
अनेक वेळा मुलांना आपल्या जोडीदाराला ताब्यात ठेवायचे असते. अशी मुले ‘रेड फ्लॅग’ कॅटेगरीत येतात. ही मुले आपल्या जोडीदाराला प्रत्येक छोट्या गोष्टीवर थांबवतात, तिच्यावर संशय घेऊ शकतात. जोडीदाराच्या प्रत्येक निर्णयावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात.
‘रेड फ्लॅग’ कॅटेगरीत मुले त्यांच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करत नाहीत. प्रत्येक संभाषणात त्यांचा अपमान होईल, असे वागतात. इतरांसमोर त्यांची चेष्टा करतात. जोडीदाराच्या भावना आणि विचारांची पर्वा करत नाहीत.
‘रेड फ्लॅग’ कॅटेगरीतील मुले त्यांच्या पार्टनरचा आदर करत नाहीत. अशा लोकांना खोटं बोलण्याचीही सवय असते. ते पुन्हा-पुन्हा खोटे बोलतात. अनेक गोष्टी लपवतात. ‘रेड फ्लॅग’ कॅटेगरीतील मुलांचे वर्तन आक्रमक असते. लहान-सहान गोष्टींवर त्यांना राग येऊ शकतो. याशिवाय रागाच्या भरात शिवीगाळ करणे, धमकावणे यासारखे प्रकारही करू शकतात. या मुलांपासून दूर राहावे. त्याने भविष्यातील धोका टाळता येऊ शकतो.