आपण तरूण दिसावं अशी स्त्रीसह पुरुषांचीही इच्छा असते. पण, विशेषत: महिलांकडून सौंदर्य प्रसाधने लावण्यात येतात. स्त्रीची इच्छा असते की तिचे वय वाढले तरी तिची त्वचा नेहमी तरुण दिसावी आणि सुरकत्या अजिबात नसाव्यात. यासाठी बाजारात अनेक प्रकारची सौंदर्य प्रसाधने मिळत आहेत. पण, हे वापरताना काळजी घ्यावी लागते. कारण, यातून हानी पोहचू शकते.
चेहऱ्यासाठी नारळाचे तेल प्रभावी ठरू शकते. नारळाच्या तेलात दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे त्वचा कोरडी होण्यापासून रोखतात. तसेच, जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला नारळाच्या तेलाने मसाज केले तर ते फ्रिकल्सच्या खुणा हलके करू शकतात. याशिवाय हे चेहऱ्याला ग्लो देण्याचे काम करते. तसेच असा एक प्रभावी अँटी-एजिंग पॅक आहे, ज्यातून चेहऱ्यासाठी फायद्याचे ठरते. हा पॅक बनवण्यासाठी कॉफी पावडर 1 टी-स्पून, हल्दी पावडर – 1 टी-स्पून, नारळ तेल 1 टी-स्पून, लिंबू – १/२ लिंबाचा रस यांच्या माध्यमातून पेस्ट तयार करा.
सर्वकाही चांगले मिसळा, एक पेस्ट तयार करा. आता ते चेहऱ्यावर लावा आणि काही वेळ ठेवल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. याने तुमच्या चेहऱ्यावर चांगला परिणाम दिसू शकणार आहे. असे जरी असले तरी प्रत्येकाचा स्कीन प्रकार वेगवेगळा असल्याने काही अवलंब करण्यापूर्वी चेहऱ्याला काय सूट होते काही नाही हेदेखील पाहावे. कारण, याने याचा दुष्परिणाम दूर करता येऊ शकतो.