सध्या वाढत्या उष्णतेमुळे अंगाची अक्षरश: लाही-लाही होताना दिसत आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा जास्त उष्णता राहणार असल्याचे सांगितले जात आहे. या उष्णतेपासून वाचण्यासाठी एसी, फॅन, कूलरसारख्या उपकरणांचा वापर वाढला आहे. पण, एसी वापरताना त्याची सर्व्हिसिंगही महत्त्वाची असते. नाहीतर दुर्घटना घडण्याचीही शक्यता निर्माण होते.
एसीची घरबसल्या सर्व्हिसिंग करता येऊ शकणार आहे. त्यात एसीची सर्व्हिसिंग दोन प्रकारची असते. हार्ड सर्व्हिस आणि सॉफ्ट सर्व्हिस. हार्ड सर्व्हिस म्हणजे ज्यासाठी तंत्रज्ञांची मदत घ्यावी लागते. तुम्ही सॉफ्ट सर्व्हिस स्वतः करू शकता. सॉफ्ट सर्व्हिस करण्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत ज्याची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे. तुम्ही बऱ्याच काळाने एसटी सुरू करता तेव्हा तुम्हाला पहिल्यांदाच त्याची खूप काळजी घ्यावी लागते.
सतत 4-5 महिने बंद राहिल्यामुळे एसीमध्ये खूप घाण साचते. ते स्वच्छ करण्यासाठी हार्ड सर्व्हिस आवश्यक आहे. एकदा हार्ड सर्व्हिस पूर्ण झाल्यावर, तुम्ही दर 15 ते 20 दिवसांच्या अंतराने सॉफ्ट सर्व्हिस करून तुमचा एसी मेंटेन करू शकता. तुम्ही विंडो एसी वापरत असाल किंवा स्प्लिट एसी, दोन्हीचे फिल्टर स्वच्छ ठेवणे खूप महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या एसीचा पुढचा ग्रिल उघडता तेव्हा तुम्ही त्यात एक फिल्टर ठेवू शकाल.
एसी खोलीतील हवा आत घेतो आणि कॉईलला घाणीपासून वाचवण्यासाठी हे फिल्टर दिलेले आहे. या फिल्टरवर 15-20 दिवसांत बरीच घाण जमा होते. ते वेळोवेळी पाण्याच्या जोरदार प्रवाहाखाली धुतल्याने तुमच्या एसी कॉईलमध्ये घाण साचण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. यामुळे लवकर हार्ड सर्व्हिसची गरज नाहीशी होते.