Gold Rate: अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापारी तणावादरम्यान सोन्याच्या किमतींनी नवीन उच्चांक गाठला आहे. प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 95,500 रुपये झाली, दरम्यान, भारतात आज सोन्याच्या 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅमचा दर 87,540 रुपये, सोन्याच्या 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅमचा दर 95,500 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 71,630 रुपये आहे. तर जीएसटीसह किमती 96,000 रुपयांच्यावर पोहोचल्या आहेत. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने एप्रिलच्या अखेरीस सोन्याच्या किमती प्रति १० ग्रॅम १ लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतात असा अंदाज विश्लेषकांनी वर्तवला आहे. सोन्याचे भाव सध्या प्रति १० ग्रॅम 93,500 ते ₹95,500च्या दरम्यान आहेत.
किमतीतील वाढ बाजारातील अस्थिरतेमुळे वाढले आहेत. किमती वाढीचा फायदा गुंतवणूकदारांना झाला असला तरी, ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे, ज्यामुळे ज्वेलर्सच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, भारतात आज 15 एप्रिल रोजी आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 99.80 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 99,800 रुपये आहे. जागतिक बाजारपेठेत, कॉमेक्सवर सोन्याचे भाव प्रति औंस ३,२४० ते ३,२६० दरम्यान आहेत, तर भारतात, भाव प्रति १० ग्रॅम 93,500 ते 95,500 पर्यंत आहेत. सध्या सुरू असलेल्या व्यापार तणाव आणि बाजारातील अनिश्चिततेमुळे सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.