नवी दिल्ली : सध्या फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर आणि इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. व्हॉट्सॲपचा वापर लाखो युजर्स करतात. त्यामुळे कंपनीकडून नवंनवे फिचर्स देण्याचा प्रयत्न असतो. व्हॉट्सॲपही युजर्ससाठी त्यांच्या गरजेनुसार फिचर देतं असतं. पण आता तुम्हाला व्हॉट्सॲपवरून मेसेज शेड्यूल करता येऊ शकणार आहे.
शेड्यूल फीचरच्या माध्यमातून जवळच्या व्यक्तींना ठरलेल्या वेळेनुसार हॅप्पी बर्थडे, गुड नाईट आणि गुड मॉर्निंगसारखे मेसेज पाठवू शकाल. कोणताही महत्त्वाचा मेसेज शेड्यूल करू शकता आणि हा मेसेज ठरलेल्या वेळेनुसार आपोआप इतर युजर्सपर्यंत पोहोचेल. व्हॉट्सॲपवर ऑटोमॅटिक मेसेज पाठवण्यासाठी थर्ड पार्टी ॲपचाही वापर केला जाऊ शकतो. या ॲप्समध्ये शेड्यूलर, ड्युएट लेटर आणि स्किडिट थर्ड पार्टी ॲप्सचा समावेश आहे.
या ॲप्सच्या मदतीनं तुम्ही व्हॉट्सॲपवर मेसेज शेड्यूल आणि पाठवू शकता. गुगल प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवरून हे ॲप्स सहज डाऊनलोड करू शकता आणि काही टिप्सचा अवलंब करून मेसेज शेड्यूल करू शकता.
असा करा मेसेज शेड्यूल…
– व्हॉट्सॲपवर मेसेज शेड्यूल करण्यासाठी सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून थर्ड पार्टी ॲप डाऊनलोड करा.
– यानंतर फेसबुक अकाऊंटवरून साइन इन करा. आता तिथे आपले नाव, ईमेल आणि पासवर्ड टाकून अकाउंट सुरु करा. यानंतर तुमच्या ई-मेलवर व्हेरिफिकेशन ई-मेल येईल. याची पडताळणी केल्यानंतर तुम्ही एका सर्व्हिस पेजवर जाऊन व्हॉट्सॲपवर क्लिक करा आणि थर्ड पार्टी ॲपला आवश्यक परवानग्या द्या.
– तुम्हाला ज्या लोकांचे मेसेज शेड्यूल करायचे आहेत ते सिलेक्ट करा. आता तुम्ही या लोकांना केव्हाही मेसेज करू शकता.