पुणे प्राईम न्यूज डेस्क : प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न ही एक विशेष बाब असते. आपला जोडीदार चांगला असावा अशी सर्वच तरूण-तरूणींची इच्छा असते. मात्र, हा जोडीदार शोधत असताना स्वतःमध्ये व आपल्या जोडीदारामध्ये मॅच्युरिटी असणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास लग्न झाल्यानंतर काही महिन्यांतच घटस्फोटासारखी प्रकरणे उद्भवू शकतात.
यापूर्वी मुलगी 18 वर्षांची होण्याआधीच तिचे लग्न लावून दिले द्यायचे. लग्नासाठी ती शारीरिक तसेच मानसिकरित्या मॅच्युअर आहे किंवा नाही, असे काहीच पाहिले जात नव्हते. मुलगी ही ‘पराया धन’ असते. तिला सासरी जावे लागत असल्याने तिचा शिक्षण काय कामात येईल. अशी त्या काळची समाजात विचारधारणा होती. मात्र, आता काळ बदलला आहे. मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 विवाहासाठी योग्य असल्याचे ठरवून देण्यात आले आहे. मात्र, असे ठरवून देखील घटस्फोटाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
यामागील कारण म्हणजे वधू अथवा वरामध्ये असलेल्या सामंजस्य अथवा मॅच्युरिटीचा अभाव. मात्र, मुलगा-मुलगीमध्ये किती वर्षांचे अंतर आहे, हे देखील पाहणे आवश्यक आहे. तेव्हाच त्यांच्यात बांधली गेलेली लग्नगाठ अधिक घट्ट होत असते. जर वर आणि वधू यांच्यात प्रमाणापेक्षा जास्त अंतर असेल तर त्यांच्या विचारात दरी निर्माण होते.
तरुण-तरुणीतील वयाचे अंतर फार नसावे
कमी वयात विवाह झाला असेल तर त्याचा प्रभाव आपल्या भावी आयुष्यावर पडणार यात शंका नाही. त्यामुळे तरुण-तरुणी यांच्या वयात पाच ते सहा वर्षांपेक्षा जास्त अंतर नसावे. हे विवाह निश्चित करण्यापूर्वी आई-वडिलांनी तसेच मुला-मुलीनेही पाहणे आवश्यक आहे. तसे न केल्यास अनेक अडचणी उद्भवू शकतात.