बापू मुळीक / सासवड : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि संजय जगताप यांनी सातत्याने जेजुरी औद्योगिक क्षेत्रात उद्योग वाढीसाठी व उद्योगाच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न केले आहेत. उद्योजक आणि कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत पुढाकार घेणारे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांना या विधानसभा निवडणुकीत जेजुरी उद्योजक संघ व जेजुरी उद्योग सेवा पुरवठादार संघटना जाहीर पाठिंबा देत आहे, असे जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे यांनी सांगितले.
जेजुरी जिमा व जिसा संघटनेच्या वतीने मतदान जनजागृती अभियानाचे आयोजन केले होते. यावेळी सर्व उद्योजक आणि कामगारांनी जागरूकपणे मतदान करण्याचे आव्हान दोन्ही संघटनेच्या वतीने करण्यात आले. मूलभूत सुविधा संजय जगताप यांनी तीर्थक्षेत्र जेजुरी विकास आराखडा शहरासाठी, मूलभूत सुविधा, एमआयडीसीसाठी कायमस्वरूपी पाणी योजना, जेजुरी व सासवड शहराला वीर धरणातून पाणी योजना, या योजनेसाठी सोलर योजना, जेजुरी शहर परिसर व औद्योगिक वसाहतीसाठी पेशवे तलावात पाणी योजना, आदी विषयी माहिती दिली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, विजय कोलते ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माणिक झेंडे पाटील, काँग्रेसचे कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पोमण, बापू भोर, बाजीराव जगदाळे, डॉ. रामदास कुटे, रवींद्र जोशी, पांडुरंग सोनवणे, शकील शेख, आनंद देशमुख, प्रशांत लाखे ,जीसाचे अध्यक्ष सुरेश उबाळे आदी उपस्थित होते.