पुणे: हिंदू धर्मात चातुर्मासातील श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. हा महिना भगवान शंकराला समर्पित असल्यामुळे या काळात भक्त मनोभावे त्यांची पूजा करतात. विशेषतः श्रावणातील प्रत्येक सोमवारला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावण सोमवारी उपवास करून भगवान शंकराची पूजा केली जाते आणि ‘शिवामूठ’ वाहिली जाते.

शिवामूठ म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व:

‘शिवामूठ’ म्हणजे शिवलिंगावर एक मूठभर धान्य अर्पण करणे. ही एक धार्मिक परंपरा आहे, जी शिव पुराणात पुण्यदायक मानली गेली आहे. असे मानले जाते की शिवामूठ वाहिल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि सर्व संकटे दूर होतात. हे व्रत नवविवाहित स्त्रियांसाठी विशेष महत्त्वाचे मानले जाते, लग्नानंतर सलग पाच वर्षे हे व्रत करावे असे मानले जाते.

शिवामूठ कशी वाहावी?
श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ वाहिली जाते. याची एक विशिष्ट पद्धत आहे:
पहिला सोमवार: शिवामूठ तांदूळ
शिवामूठ वाहतांना कोणता मंत्र म्हणावा
‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।। ‘
मंत्रोच्चार करणे शक्य नसल्यास, शिवा शिवा महादेवा… माझी शिवामूठ अर्पण करते स्वीकार कर, अशी प्रार्थना करावी. जर श्रावण महिन्यात पाचवा सोमवार आला, तर पाचव्या सोमवारी पाचही धान्यांची शिवामूठ एकत्र वाहिली जाते. या व्रतामुळे भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. यावर्षीही श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी मोठ्या संख्येने भाविकांनी मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले आणि शिवामूठ वाहिली.







