सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. या उन्हाळ्यात मुलांचे कपडे काळजीपूर्वक निवडले पाहिजेत जेणेकरून ते स्टायलिश तर दिसतील आणि आरामदायकही वाटतील. जाड कपडे, घट्ट फिटिंग आणि गडद रंग यामुळे तुम्हाला उष्णतेमध्ये अस्वस्थ वाटू शकते. या सीझनमध्ये मुलांसाठी हलक्या रंगांच्या कपड्यांचा वापर करावा.
उन्हाळ्यात कापूस, तागाचे कपडे निवडणे फायद्याचे ठरते. या कपड्यांमध्ये हवेचा संचार होतो, ज्यामुळे तुमच्या बाळाला उन्हाच्या तीव्रतेमुळे त्रास होण्याची शक्यता फार कमी होऊन जाते. बाळामध्ये थंडावा येतो आणि त्यामुळे चिडचिडही कमी होते. जाड किंवा सिंथेटिक कपडे टाळा. ज्यामुळे जास्त गरम होऊ शकते. अतिरिक्त आराम आणि संरक्षणासाठी, तुमच्या मुलांचे कपडे हलके असावेत याकडे लक्ष द्या. हे घाम काढून टाकण्यास मदत करते. पुरळ उठण्यास प्रतिबंध करते.
जर तुमचे बाळ चालत असेल किंवा रांगत असेल, तर आराम आणि सुरक्षिततेसाठी सॉफ्ट-सोलेड शूज किंवा सँडल आवश्यक आहेत. पडण्यापासून टाळण्यासाठी नॉन-स्लिप सोलसह शूजचा वापर करावा. घरामध्ये असल्यास, पायाच्या नैसर्गिक विकासासाठी अनवाणी राहणे चांगलेच ठरू शकते. या गोष्टींकडे लक्ष दिल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.