LifeStyle : तरूण अथवा तरूणी नाते कसं जपावं यासाठी विचार करत असतात. अनेकजण म्हणतात ‘फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन’ याचा अर्थ जर तुम्ही पहिल्या भेटीत त्या व्यक्तीवर प्रभाव पाडू शकत नसाल तर त्याच्या मनात तुमच्याबद्दल चुकीची धारणा निर्माण होऊ शकते. म्हणूनच एखाद्या व्यक्तीशी तुमच्या पहिल्या भेटीत छाप पाडणे महत्त्वाचे ठरते.
जेव्हा कोणी पहिल्यांदाच डेटवर जातो तेव्हा त्याच्या मनात अनेक प्रकारच्या भावना येतात ज्यात चिंता आणि उत्सुकता यांचा समावेश होतो. अशी भावना होणे स्वाभाविक आहे. परंतु काहीवेळा, या भावनांमध्ये बुडून, लोक त्यांच्या पहिल्या डेटला समोरील व्यक्तीला काही चुकीचे प्रश्न विचारतात, ज्यामुळे त्यांची दुसऱ्या डेटला जाण्याची शक्यता कमी होते. सध्या कोणत्याही नात्याचे भवितव्य मुख्यत्वे पहिल्या डेटवर अवलंबून असते. म्हणूनच पहिली डेट प्रत्येकासाठी खूप खास असते. हा दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी लोक सर्वतोपरी प्रयत्न करतात.
पण जर आपल्याला पहिल्या डेटला एखाद्याला इम्प्रेस करायचं असेल, तर बोलताना आपले शब्द काळजीपूर्वक वापरणे आवश्यक आहे. जर सर्व काही ठीक झाले तर मत व्यक्त करण्यासाठी भरपूर वेळ मिळू शकतो. त्यामुळे पहिल्या डेटला बोलताना खूप काळजी घेतली पाहिजे.
हे प्रश्न विचारणे टाळाच…
– किती पैसे कमावता?
– आत्तापर्यंत तुम्ही सिंगल का?
– जर रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमचं आधीचं रिलेशन का संपलं?
– तुमच्याकडे स्वत:चं घर आहे का?