एखादी पार्टी असो वा कोणताही मोठा कार्यक्रम महिलांचे विशेष लक्ष त्यांच्या कपड्यांवर तर असतेच. याशिवाय कोणते सँडल/चप्पल वापरण्यापासून ते काजळ या गोष्टींचाही विचार होतो. पण, तुम्ही देखील ट्रेंडी काजळच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला काही पर्यायाची माहिती देणार आहोत.
सध्या मस्करा हा मेकअपचा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. काजळच्या सहाय्याने तुमचे डोळे बोलके होतात आणि स्टायलिश ड्रेसमधील तुमच्या लूकलाही आकर्षक बनवू शकतो. जेव्हा तुम्ही काजळ लावाल तेव्हा इतर मेकअपबरोबर त्याचे मॅचिंग होत आहे का ते आवश्य पाहा. तपकिरी रंगाचे काजळही उपलब्ध आहे. जर तुम्ही पार्टीत जात असाल आणि तुम्हाला स्मोकी लूक हवा असेल तर डोळ्याच्या खाली आणि वर दोन्ही बाजूंनी तपकिरी काजळ वापरा.
तसेच ब्लॅक काजळ एव्हरग्रीन आहे. त्यास तुम्ही पाहिजे तेव्हा लावू शकता. स्त्रिया घरातसुद्धा डोळ्यांना हे काजळ लावू शकतात. जर आपण काजळामध्ये निळा रंग वापरत असाल तर आपले डोळे खूप सुंदर दिसतात. त्यातील सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे यातील प्रत्येक रंग टोनवर एक चांगला लूक देतो. जर मॉडर्न ड्रेसवर तुम्ही ब्ल्यू काजळ लावले तर तुम्ही आणखीनच सुंदर दिसाल.