Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चंद्राच्या शीतल प्रकाशात ‘मसाला दूध’ बनवण्याची पारंपरिक पद्धत; अनेकजण करतात ‘ही’ चूक

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 5 October 2025, 12:41

पुणे: कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima) म्हटलं की, सर्वांच्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे चंद्राच्या शीतल प्रकाशात एकत्र बसून प्यायलेला गरमागरम ‘मसाला दूध’चा ग्लास! थंडीची चाहूल लागलेल्या वातावरणात, मसाला दूध पिण्याची परंपरा खूप जुनी आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या रात्री चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण असतो आणि त्याच्या प्रकाशात ठेवलेले दूध अमृतासमान ठरते. दरम्यान, अनेकजण मसाले दुध घरात बनवता ज्यामुळे चंद्राचा प्रकाश त्यात पडत नाही. यावर्षी तुम्ही जर घरीच खास पारंपरिक चवीचं आणि दाटसर मसाला दूध बनवण्याचा विचार करत असाल, तर ही पारंपरिक रेसिपी नक्की ट्राय करा.

कोजागिरी स्पेशल मसाला दूध रेसिपी 

आवश्यक साहित्य:

कोजागिरीसाठी मसाला दूध तयार करण्यासाठी प्रामुख्याने 1 लिटर (म्हशीचे किंवा फुल-फॅट) दूध घ्यावे. याशिवाय, दुधाला गोडवा आणण्यासाठी चवीनुसार साखर (साधारण 4 ते 5 टेबलस्पून) वापरावी. मसाला दुधाला खास रंग आणि सुगंध देण्यासाठी केशर आवश्यक आहेत. दुधाला अधिक दाटसरपणा आणि चव देण्यासाठी 2 ते 3 टेबलस्पून तयार केलेली मसाला दूध पावडर वापरावी किंवा ती घरी तयार करावी. अंतिम सजावट आणि चवीसाठी ड्रायफ्रुट्स (काजू, बदाम, पिस्ता) 2 ते 3 टेबलस्पून वापरावेत.

 

दुधाचा खास मसाला बनवण्यासाठी:

कोजागिरीच्या दुधासाठी खास दुधाचा मसाला तयार करण्यासाठी तुम्ही बदाम,  काजू आणि पिस्ता घ्या. या सुक्या मेव्यासोबतच, मसाल्याला सुगंधासाठी 8 ते 10 वेलची आणि चवीसाठी 1/4 चमचा जायफळ पूड एकत्र करून घ्या. हे सर्व साहित्य हलके गरम करून त्याची बारीक पूड (मसाला पावडर) करून घेतल्यास कोजागिरीचे दूध अधिक चवदार आणि पारंपरिक होते.

कृती (Steps):

1. दूध आटवणे: एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध घेऊन मंद आचेवर गरम करायला ठेवा. दुधाला चांगली उकळी आल्यावर गॅस कमी  करा. दूध सतत ढवळत राहा, जेणेकरून ते पातेल्याला खाली लागणार नाही. दूध साधारण 10 ते 15 मिनिटे आटवून घ्यावे. (दूध आटवल्याने चवदार आणि मलाईदार होते.)

2. साखर आणि मसाले मिक्स करणे: दूध थोडे घट्ट झाल्यावर त्यात साखर टाकून ती पूर्णपणे विरघळू द्या. साखर विरघळल्यावर त्यात केशर आणि तयार मसाला दूध पावडर टाका.

3. एकजीव करा: हे मिश्रण चमच्याने चांगले ढवळून घ्या. मसाला दुधामध्ये व्यवस्थित मिसळल्यावर, दूध मंद आचेवर अजून 4 ते 5 मिनिटे उकळू द्या, जेणेकरून चांगली चव येईल.

4. सर्व्ह करा: गॅस बंद करा. आता त्यात ड्रायफ्रुट्स टाका. गरमागरम मसाला दूध काचेच्या ग्लासात किंवा कपात काढून घ्या.

5. कोजागिरीची तयारी: हे तयार केलेले मसाला दूध कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या शीतल प्रकाशात बनवा. व देवी लक्ष्मीला नैवेद्य दाखवा आणि नंतर कुटुंब व मित्रपरिवारासोबत त्याचा आस्वाद घ्या! या आनंदमय रात्रीचा गोडवा मसाला दुधामुळे नक्कीच वाढेल.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47
Next Post

Kojagiri Purnima Pooja: आरोग्य, लाभ आणि समृद्धीसाठी 'अशी' करा कोजागिरी पौर्णिमेची पूजा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp