पुणे प्राईम न्यूज डेस्क: वयानुसार हळूहळू थकवा जाणवायला लागतो. मग तेव्हा शारीरिक हालचाली कमी होतात. असे जरी असले तरी तुम्ही तुमचा मेंदू अॅक्टिव्ह ठेऊ शकता. त्यासाठी तुम्ही असे काही गेम्स आहेत ते खेळल्यास तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. त्यापैकी एक म्हणजे सुडोकू. सुडोकूत वारंवार व्यस्त राहिल्याने एकाग्रता सुधारते आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढते.
जिगसॉ पझल हा देखील एक चांगला गेम आहे. यातून समाधानाची भावना जागृत करता येऊ शकते. जिगसॉ पझलमध्ये प्रत्येक तुकडा त्याच्या जागी बसल्यामुळे प्रतिमा आकार घेते. यामुळे यश आणि समाधानाची भावना येते. कोडींवर काम करणे हा संयम आणि डिटेल्सकडे लक्ष देण्याचा एक अद्भुत व्यायाम आहे. तसेच सायमन हा एक लोकप्रिय मेमरी गेम आहे. वृद्धांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी हे एक प्रभावी साधन आहे.
मेंदूचे अशाप्रकारचे खेळ हे वृद्धांची मानसिक चपळता, स्मरणशक्ती आणि समस्या सोडवण्याचे कौशल्य वाढवण्याचा एक मजेदार आणि प्रभावी मार्ग आहे. अनेक वृद्ध मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्याचे मार्ग शोधतात. पण त्यांनी अशाप्रकारचे ब्रेन गेम्स खेळल्यास त्यांच्या क्षमतेवर नक्कीच सकारात्मक परिणाम होऊ शकतो.