पुणे प्राईम न्यूज डेस्क: सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. अनेकजण थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काहीना काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यात पायांकडे लक्ष दिले जात नाही. मात्र, आता तसे करण्याची गरज भासणार नाही. तुम्ही हिवाळ्याच्या दिवसांतही असे बूट वापरू शकता, ज्याच्या माध्यमातून तुमचा थंडीपासून तर बचाव होईलच, शिवाय तुमचे व्यक्तिमत्त्वही उठून दिसेल.
हिवाळ्याच्या दिवसात तुम्हाला कोणताही सर्वसामान्य बूट वापरण्याची गरज नाही. तसेही मुलींना काहीतरी स्टायलिश हवे असते. त्यामुळे अँकल शूज हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे शूज तुमचे थंडीपासून तर संरक्षण करतीलच शिवाय तुमच्या सुंदरतेतही भर घालतील. वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हे शूज उपलब्ध आहेत. याशिवाय, तुम्हाला दररोज मॉडर्न लूक हवा असेल तर त्यासाठी दररोज नवे बुट्स विकत घेण्याची गरज नाही. बुटांच्या पद्धतीत काही किरकोळ फेरबदल करून तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. त्यात तुम्ही मोटो बुट्स वापरू शकता. त्यातून तुम्हाला मॉर्डन लूक मिळू शकतो.
जुन्या आऊटफिट्सवर चांगले दिसावे असे बूट तुम्ही निवडत असाल, तर तुम्ही थायहायचा पर्याय निवडला पाहिजे. ओव्हर-द-नी प्रकारचे हे बूट असतात. त्यामुळे तुमचे आउटफिट्सही चांगले दिसू लागतात. स्वेटचे असो अथवा लेदरचे दोन्ही प्रकारातील बूट आकर्षक दिसतात.