पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपण सुंदर दिसावं यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. विशेषत: महिला वर्गाला आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यासह लांबसडक केस असावेत असे वाटत असते. त्यासाठी काहीना काहीतरी केलं जातं. बऱ्याचदा जाहिरातींकडे पाहून दिशाभूल होण्याची शक्यता असते. पण असे काही घरगुती उपाय आहेत त्याने तुमचे केस घनदाटसह लांबसडकही होतील.
भेंडी केसांसाठी फायदेशीर मानली जाते. भेंडी अर्थात लेडीफिंगर कंडिशनर आणि जेल हे घरी बनवता येऊ शकतील. हे घरी बनवण्यासाठी 15 भेंडी घ्या आणि कापा आता एका भांड्यात चिरलेली भेंडी ठेवा आणि 2 कप पाणी घाला. मंद आचेवर शिजवा आणि मध्ये-मध्ये ढवळत राहा. तुम्ही त्यामध्ये ताजे रोझमेरीदेखील घालू शकता. परंतु हे पूर्णपणे तुमच्या इच्छेवर आहे. भेंडी 20 ते 25 मिनिटे शिजवल्यानंतर, पाणी घट्ट होऊ लागेल आणि जेलसारखे दिसेल. त्यानंतर गॅस बंद करा आणि हे पाणी थंड होऊ द्या.
त्यानंतर एक मोठे भांडे घ्या आणि त्यावर मलमलचे कापड ठेवा. या कपड्यावर भेंडीचे मिश्रण घाला आणि ते पिळून घ्या. जमा झालेली जेल भांड्यात पडणे सुरू होईल. हे तयार केलेले हेअर जेल कंडिशनर म्हणूनही वापरले जाऊ शकते. ते एका आठवड्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेऊन तुम्हाला वापरता येऊ शकते. याने फायदाही मिळू शकतो.