पुणे प्राईम न्यूज डेस्क: उन्हाचा कडाका वाढत आहे. त्यामुळे फॅन, एसी, कूलर यांसारख्या उपकरणांचा वापरही वाढला आहे. त्यात बाजारात एअर कंडिशनरची मागणी वाढू लागली आहे. जेव्हा जेव्हा कोणी नवीन एसी खरेदी करण्यासाठी बाहेर जातो तेव्हा त्यांच्यासमोर सहसा दोन पर्याय असतात. एक इन्व्हर्टर एसी आणि दुसरा नॉन इन्व्हर्टर एसी. दोन वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या या एअर कंडिशनरबद्दल अनेक गैरसमज आणि समज आहेत. पण, नक्की काय फायद्याचे राहील, याची आम्ही तुम्हाला आज माहिती देणार आहोत.
इन्व्हर्टर एसी आणि नॉन इन्व्हर्टर एसी हे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानावर काम करणारे एअर कंडिशनर आहेत. इन्व्हर्टर एसीमध्ये तुम्ही कंप्रेसरच्या स्पीडपासून ते करंट, व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सीपर्यंत सर्व काही नियंत्रित करू शकता. मात्र, नॉन इन्व्हर्टर एसी तुम्हाला असा कोणताही पर्याय देत नाही. तुम्ही हे अशा प्रकारे समजू शकता की जर तुम्ही नॉन इन्व्हर्टर एसी 24 अंशांवर सेट केला तर तो खोलीचे तापमान 24 अंशांपर्यंत पोहोचेपर्यंत पूर्ण क्षमतेने चालतो.
दुसरीकडे, इन्व्हर्टर एसी वेगवेगळ्या व्होल्टेज आणि स्पीडमध्ये समान काम करू शकतो. याचा अर्थ असा की, जर तुम्हाला तुमची खोली लवकर थंड करायची असेल तर तुम्ही इन्व्हर्टर एसीला 24 अंशांवर 60 टक्के पॉवर वापरण्यासाठी सेट करू शकता. याने तुम्हाला वीजेच्या वापरता थोडा-फार बदलू करता येऊ शकतो.