पुणे प्राईम न्यूज डेस्क: केस काळे अर्थात हेअर डाय करण्याचे प्रमाण अनेकांचे वाढले आहे. मग कधी सलूनमध्ये तर कधी घरीच केस काळे केले जातात. तुम्ही देखील घरीच हेअर डाय करत असाल तर काही गोष्टींची काळजी नक्की घ्यावी. असे केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो.
डाय लावताना ऑईल बेस निवडावा किंवा डाय धुतल्यानंतर ऑईल मसाज करावा. कारण डाय किंवा हेअर कलरमुळे केस, त्वचा कोरडी, रुक्ष होते. त्वचा ऑईल बेस कमी होतो. त्यामुळे नव्याने येणाऱ्या केसांचे पोषण योग्य प्रमाणात होत नाही. केस शॉर्ट असतील तर एकाच वेळी पूर्ण पॅक न वापरता अर्धाच मिक्स करा. गरज असेल तरच पूर्ण पॅक वापरा. शिल्लक पॅक पुन्हा व्यवस्थित बंदिस्त करुन ठेवा.
डाय, कलर पॅकसोबत दिलेल्या सूचना अवश्य वाचा. जर रॅश, अॅलर्जी असे काही आढळले, तर त्वरित स्कीन स्पेशालिस्टकडे जा. घरगुती उपचार करण्यात वेळ घालवू नका. डाय किंवा हेअर कलरचा दर्जा आणि प्रमाण याकडे लक्ष जरूर द्या. डाय करताना आधी स्कीन टेस्ट करा. अन्यथा रॅशमुळे चेहऱ्याची, कानामागची, त्वचा काळी पडू शकते. या गोष्टींकडे लक्ष दिल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.