पुणे प्राईम न्यूज डेस्क: कपडे ही गरजेच्या वस्तूंपैकी एक आहे. मग ते मोठ्यांचे असो वा लहानांचे. ते घेताना विचार करूनच घ्यावेत. कारण सध्या जवळपास सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यामुळे कोणत्याही वाढीव दरातील कपडे घेणे टाळावे. याचा फायदा भविष्यात नक्की होऊ शकतो. कपडे घेताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
आजकाल ट्विनिंग करण्याची पद्धत असल्यामुळे आई किंवा वडिलांच्या कपड्यांसोबत मॅच होणारे अथवा एकसमान कपडे मुलांसाठी खरेदी केले जातात. तुम्ही मुलांसाठी हवे तसे कपडे खरेदी करू शकता. मात्र, त्यांच्या आरोग्यासाठी कपडे आरामदायक आहेत का हे मात्र जरूर तपासा.
कपड्यांवरचा अतिरिक्त खर्च टाळा
कपड्यांवर जास्त खर्च करणे टाळावे. कारण, लहान मुलांचे कपडे मोठ्यांपेक्षा जास्त महाग मिळतात. शिवाय तुमची मुलं वाढत्या वयात असल्याने त्यांची वाढ झटपट होते. त्यामुळे खरेदी केलेले कपडे अनेकदा परत वापरता येत नाही. परिणामी, केलेला खर्च वाया जाऊ शकतो. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करूनच कपडे खरेदी करावे, असा सल्ला दिला जातो.
ड्रेसचं फॅब्रिक आरामदायक असावं
लहान मुलांचे कपडे घेताना ड्रेसच्या फॅब्रिककडे विशेष लक्ष द्यावे. तुमच्या बाळाच्या ड्रेसचं फॅब्रिक आरामदायक नसेल तर काहीच फायदा नाही. लहान मुलांना नेहमी सूती, मऊ कपडे आवडतात. त्यामुळे कपडे सूती किंवा मऊ असावे, याकडे लक्ष द्यावे.