पुणे: भारतात चहाची आवड असणारे अनेक लोक आहेत आणि प्रत्येकाचा चहा बनवण्याचा (Food Hacks) आणि पिण्याचा अनुभव वेगळा असतो. अनेकजण घरी चहा बनवताना उकळलेले कोमट दूध वापरतात, तर चहाच्या स्टॉल्सवर मात्र दूध न उकळता ते थेट चहासाठी वापरतात. चहाची खरी चव कशामुळे उत्तम राहते, यावर चहा तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे.

चहा तज्ज्ञांचे मत काय?

चहा बनवण्यासाठी तुम्ही कसे दूध वापरता, याचा चहाच्या चवीवर मोठा परिणाम होतो. अनेक चहा तज्ज्ञांच्या मते, उकळलेले दूध वापरल्यास चहाची मूळ चव बिघडण्याची शक्यता आहे.. आजकाल सहसा पॅकेज केलेले (Pasteurized) दूध वापरले जाते. हे दूध आधीच तापवलेले असते.

घरी हे दूध पुन्हा उकळल्यामुळे किंवा त्यात पाणी मिसळल्यामुळे दुधाची चव खराब होते आणि ते अधिक पातळ होते. म्हणूनच, अनेक चहाचे स्टॉल्स दूध न उकळता थेट चहात वापरतात. यामुळे चहाला अधिक क्रेमी (Creamy) आणि चांगली चव येते, जी चहाप्रेमींना अधिक आवडते. दूध चहाला केवळ रंग देत नाही, तर त्यामुळे चहाची चवही चांगली होते.
चहा हा केवळ एक पेय नव्हे, तर ती एक भावना आहे. त्यामुळे चहा अधिक चविष्ट बनवण्यासाठी ‘पाश्चराइज्ड’ दूध पुन्हा न उकळता वापरल्यास त्याची चव अधिक चांगली होऊ शकते.







