पुणे प्राईम न्यूज डेस्क: चेहरा सुंदर दिसावं यासाठी फक्त महिलाच नाहीतर पुरुष देखील प्रयत्न करत असतात. फक्त दोघांची मेकअप करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. पण असे काही घरगुती उपाय आहेत ज्याचा अवलंब केल्यास सुंदर आणि ग्लोइंग स्कीन तुम्हाला मिळू शकते. त्याचीच आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत…
हळद आणि बेसन त्वचेसाठी फायदेशीर मानले जातात. याच्या मिश्रणामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. हळदीमध्ये असलेल्या अँटीऑक्सिंडंट गुणधर्मामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होते. तसेच यातील अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे पिंपल्सही दूर होतात. यासाठी एका वाटीत 2 चमचे बेसन पीठ आणि 1 चमचा हळद घ्यावी. दूध किंवा पाण्याच्या मदतीने पेस्ट तयार करा. हा फेस पॅक चेहऱ्याला लावा. याने चेहरा सुंदर दिसण्यास सुरुवात होईल.
तसेच जर आपण एखाद्या ठिकाणी जाणार असाल पण तुमच्याकडे आदल्या दिवशीपर्यंत स्वतःसाठी वेळ नसेल, तर टोमॅटोच्या रसात 2 चमचे दूध मिसळून ते रात्री झोपताना चेहऱ्याला लावा. दुसऱ्या दिLifestyleवशी चेहरा स्वच्छ धुवा. एका रात्रीत तुमचा चेहरा उजळलेला दिसेल. याशिवाय, एक चमचा हळदीमध्ये अॅलोव्हेरा जेल घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून अर्ध्या तासानं चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावरचं तेल कमी होण्यास मदत होईल.