निसर्गातून मिळणारे जवळपास सर्वच फळे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्याचे गुणधर्म आणि फायदेही वेगवेगळे असतात. त्यात अननस हे आपल्यापैकी अनेकांना आवडत असेल. अननस हे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. अननस खाल्ल्याने हाडांसह दातही मजबूत होतात. याशिवाय, अनेक आजारांदरम्यान रुग्णांना हे फळ खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
अननस खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. शिवाय पोटाचे विकार, लठ्ठपणा कमी करण्यासाठी या फळाचा आहारात समावेश करता येतो. अननसात असलेले घटक हृदय निरोगी ठेवण्यासाठी गुणकारी मानले जाते. यामध्ये अनेक प्रकारचे अँटी ऑक्सिडंट घटक असतात. त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते. संधिवात, हृदय आणि रक्तवाहिन्यांशीसंबंधी रोग आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांपासून रक्षण व्हायला मदत होते.
उच्च रक्तदाबाचा त्रास असलेले लोक त्यांच्या आहारात अननसाचा समावेश करू शकतात. यामध्ये भरपूर पोटॅशियम असते. तसेच सोडियमचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे शरीरात रक्तप्रवाह चांगला राहतो. अननसात अनेक जीवनसत्त्वांचे मिश्रण योग्य प्रमाणात असते. त्यामुळे या फळाचे नियमित सेवन केल्यास शरीराच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आहारात अननसाचा समावेश करावा.