Pune Prime News : लग्नानंतर हमखास प्रश्न समोर येतो तो म्हणजे फिरायला जाण्याचा. हनिमूनला जाण्याच्या प्लॅनिंगमध्ये कुठं जावं, कुठं नाही हे समजत नाही. पण भारतात अशी काही ठिकाणं आहेत, तिथं फिरायला गेल्यास मनाला अगदी प्रसन्न वाटते. त्यात देशात जर समुद्र किनाऱ्यावर आनंद घ्यायचा असेल तर त्यामध्ये मनात पहिले नाव येते ते म्हणजे गोव्याचे. याशिवाय गोव्याला तरुण जोडपे आणि नवविवाहित जोडप्यांचीही पहिली पसंती असते. येथे अनेक सुंदर समुद्र किनारे असून, तिथं तुम्ही आनंद घेऊ शकता. तिथं समुद्राच्या लाटांचा आनंद लुटता येतो.
तसेच जर तुम्ही दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेशमध्ये राहत असाल आणि हनिमूनला फार दूर जाण्याचा विचार करत नसाल तर तुम्ही नैनितालला जाऊ शकता. उत्तराखंडमधील नैनिताल हे नवविवाहित जोडप्यांसाठी एक परिपूर्ण आणि स्वस्त हनिमून डेस्टिनेशन ठरू शकते. हे खूप रोमँटिक ठिकाण आहे. याशिवाय, श्रीनगर हे जम्मू-काश्मीरमधील सर्वात मोठे आणि सुंदर शहर आहे. हे देशातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. बहुतेक नवविवाहित जोडप्यांना त्यांच्या हनिमूनसाठी येथे जायला आवडते.
यामध्ये तामिळनाडूतील उटी हे भारतातील प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी एक आहे, जे चहाच्या बागांसाठी खूप प्रसिद्ध आहे. हिरवेगार डोंगर आणि चहाच्या बागांनी वेढलेले असल्यामुळे उटीला डोंगरांची राणी असेही म्हणतात. येथे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत निलगिरीच्या टेकड्यांमध्ये निवांत वेळ घालवू शकता. प्रत्येक हंगामात तुम्ही येथे जाऊ शकता. येथे तुम्ही कमी बजेटमध्ये तलाव, धबधबा, बोटॅनिकल गार्डन इत्यादी ठिकाणांना भेट देण्याचा आनंद घेऊ शकता.