पुणे, ता.२०: आपण चांगलं दिसावं असं अनेकांना वाटत असतं. त्यासाठी अनेक ब्युटी ट्रिटमेंट केल्या जातात. तर केस जे आपलं व्यक्तिमत्त्व चांगलं करतं, त्याकडेही लक्ष द्यावं लागतं. पण काहींना केस गळण्याची समस्या सतावत असते. मात्र, असे काही घरगुती उपाय आहेत ते केल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
केस कधीकधी धुतल्यावर ते कमीच गळतात अशा भ्रमात राहू नका. अस्वच्छ केस जास्त त्रासदायक ठरतात. डोकं वर करून आणि पद्धतशीर चाला. घाम जास्त आला तर तो सुकण्याची वाट बघू नका, ओल्या कपड्याने तो पुसून टाका, तसे न केल्यास केसांवर याचा परिणाम होऊ शकतो. तसेच जास्वंदाच्या तेलाने आपल्या केसांची नियमितपणे मालिश करावी. त्यामुळे केस गळण्याची समस्या नाहीशी होते आणि केस अधिक मजबूत होतात.
याशिवाय, दोन व्हिटॅमिन-ई कॅप्सूल, दोन चमचे कोरफड जेल, एक चमचे मोहरीचे तेल, एक ते दीड कप पाणी हे सर्व पदार्थ एकत्र मिक्स करा आणि केसांना 30 ते 40 मिनिटांसाठी लावा. त्याचा फायदा होऊ शकतो. तसेच नवीन केसही वाढतात. जर आपण दररोज हे करू शकत नसाल तर आठवड्यातून कमीतकमी तीन दिवस, या तेलाने नक्कीच मालिश करा.
केस तेलकट असल्यास दररोज धुवावेत
आपल्या डोक्याचे केस हे पाण्याने शॅम्पू लावून धुवा. हा हेअर मास्क साधारण आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावा. यामुळे केस गळतीची समस्या कायमची दूर होईल. जर आपले केस अधिक तेलकट असतील, तर आपण दररोज आपले केस धुवावेत. आठवड्यातून किमान दोनवेळा नियमितपणे आपले केस धुवावेत. यामुळे केस आणि स्काल्पमध्ये जमा होणारी घाण निघून जाईल.