फ्रेंडशिप असो किंवा नातेसंबंध हे जपण्याला विशेष असं महत्त्व असतं. या नात्याच्या नावाखाली लोक आर्थिक मदत किंवा कर्ज मागायलाही मागेपुढे पाहत नाहीत, असे अनेकदा दिसून येते. पण, असे काही नाते असल्याने उसने मागताना त्यांना नकार कसा द्यायचा हा प्रश्न लोकांना पडतो.
जर कोणी वारंवार उसन्या पैशांची मागणी करत असेल तर त्याच्याशी थेट बोला. त्यांना तुमची आर्थिक परिस्थिती समजवून सांगा. प्रामाणिकपणे जे सांगितले जाते ते लोकांना चांगले समजते. याद्वारे तुम्ही तुमचे मत स्पष्टपणे मांडू शकाल आणि खोटे न बोलता नकारही देऊ शकाल. तसेच ‘सॉरी’ म्हणायला शिका. जेव्हा तुमचे मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला वारंवार पैशांसाठी विचारत असतील, तेव्हा त्यांना नम्रपणे नकार द्या आणि त्यांना तुमच्या मर्यादांबद्दल सांगा.
वेळ पडल्यास त्यांना स्पष्ट शब्दांत ‘सॉरी’ म्हणा. यावेळी आर्थिक मदत करू शकत नाही, असे म्हणत सॉरी म्हणा. महत्त्वाच्या कामांची माहिती द्या. तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन आणि गरजा तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना सांगू शकता. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणावर किंवा तुमच्या घरातील इतर कोणत्याही महत्त्वाच्या खर्चावर लक्ष केंद्रित करत असाल तर त्यांना तुमच्या जबाबदाऱ्या समजू शकतील. अशा प्रकारे तुमचे प्राधान्यक्रम स्पष्ट होतात आणि समोरच्या व्यक्तीलाही हे समजू शकते.