लहू चव्हाण
पाचगणी : प्रशासकीय सेवेत मान सन्मान प्रतिष्ठा मिळते, म्हणून त्यात रस दाखविण्यापेक्षा सामाजिक बांधिलकी, सामाजिक ऋण फेडण्याचे ध्येय बाळगून या क्षेत्रात तरुणांनी आले पाहिजे. अशा कर्तबगार अधिकाऱ्यांची किंबहुना चांगल्या माणसाची समाजाला गरज असल्याने तुम्ही तसे अधिकारी बना. अशी अपेक्षा पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी व्यक्त केले.
पाचगणी येथील स्कॉलर फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा व्यक्त करून उत्स्फूर्तपणे पाचगणी पोलीस ठाण्यात जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वरील अपेक्षा तरुणांकडून केली आहे. शाळेचे विद्यार्थी गार्गी घुगरे, आयान बंदरकर,भावीत पाटील,आदी बंदरकर,ऑस्टिन डी’सिल्वा,आकीब नजीर,उमेश गावडा,अक्ष सिंग अतिफ यलीगर यांनी पवार यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
यावेळी विद्यार्थी म्हणाले, मला प्रशासकीय अधिकारी होऊन जनतेची सेवा करायची आहे. सिस्टीम मध्ये सकारात्मक बदल घडवायचा आहे. सामान्य लोकांची कामे तातडीने मार्गी लावायची आहेत.अशा इच्छा या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, आम्हाला प्रशासकीय सेवेत यायचे आहे. त्यासाठी काय करावं लागेल?तुम्ही? तुम्ही प्रशासकीय सेवेत येण्याचा निर्णय कधी घेतला होता? किती तास अभ्यास करायचा?तुम्ही कुणाकडून प्रेरणा घेतली?तुम्ही या नोकरीत आनंदी आहात का?अशा अनेक प्रश्न ८ वी ते १२,वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांना विचारले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी विद्यार्थ्यांना तुम्ही चांगला माणूस बनल पाहिजे,असा सल्ला देऊन ध्येयपूर्तीसाठी खडतर परिश्रम करण्याची तयारी ठेवा. १२ वी नंतर पदवी पूर्ण करेपर्यंत ध्येय निश्चित करा. प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय असले तरी त्या स्वप्नपूर्तीस विलंब लागण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांनी ‘प्लॅन बी’ तयार ठेवला पाहिजे.