लोणी काळभोर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लोणी काळभोर (ता.हवेली) येथील तरुणांनी सायकलवर यशस्वी अष्टविनायक यात्रा केली आहे.
भारतीय स्वातंत्र्याला त्याग आणि बलिदानाचा मोठा इतिहास लाभला आहे. यातूनच त्याग आणि बलिदानाच्या मुल्यांचा संस्कार येणार्या पिढ्यांवर बिंबावा म्हणून स्वातंत्र्यदिनाचा गौरव सर्वत्र साजरा केला जात आहे. याच स्तुत्य उपक्रमाचा भाग म्हणून तरुणांनी १२ ऑगस्ट थेऊर येथून सायकलवरून अष्टविनायक यात्रेला सुरवात केली. त्यानंतर तरुणांनी मोरगाव -सिद्धेटेक -रांजणगाव -ओझंर -लेण्याद्री -महाड – पाली येथे प्रवास केला. आणि पुन्हा थेऊर येथे १५ ऑगस्टला येऊन अष्टविनायक यात्रेची सांगता केली आहे.
दरम्यान, अष्टविनायक गणपती सायकल यात्रेचा तरुणांनी “हर घर तिरंगा. हर राईड तिरंगा” अशा घोषणा दिल्या. तर स्वातंत्र्य सेनानींनी खेचून आणलेले स्वातंत्र्य जपण्याचा संदेश देत तिरंगा सायकल यात्रा काढण्यात आली आहे.
या अष्टविनायक सायकल यात्रेमध्ये वेदांत काळभोर (लोणी काळभोर ) पद्माकर सोपान उंद्रे (मांजरी खुर्द) विक्रम सुरेश कदम, विशाल नाईक (हडपसर) शुभम बापूसाहेब हरगुडे,स्वप्नील हरगुडे, आशिष शिंदे अभिषेक गाडे (वाघोली), निखिल निकम आणि मनोज निकम (चंदननगर) यांना सहभाग घेतला होता.