Yavat News : यवत: जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळ्याचे प्रस्थान येत्या काही दिवसात होणार आहे. संत तुकाराम महाराजांचा विसावा पालखी सोहळा जून्या रुढी परंपरे प्रमाणे भांडगाव गावातील मुख्य चौकात भाविकांच्या दर्शनासाठी थांबविण्यात यावा. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (Demand to stop Saint Shreshtha Tukaram Maharaj Palkhi ceremony in Bhanggaon village as per tradition)
दौंड विधानसभा काँग्रेस अध्यक्ष विठ्ठल दोरगे यांनी केले महसूल प्रशासनाला निवेदन सादर
यवत येथील मुक्कामानंतर पालखी वरवंडकडे प्रस्थान करत असताना भांडगाव (ता. दौंड) येथे पूर्वी पासून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा विसाव्यासाठी जुन्या परंपरेनुसार गावात थांबतो. ही अनेक वर्षापासूनची परंपरा असून विसाव्याच्या ठिकाणी पादुका दर्शनासाठी खोर, खुटबाव, एकेरीवाडी, पिंपळगाव वढाने, नारायणबेट, सुपा या गावांसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात येतात.(Yavat News) विसाव्या ठिकाणी ग्रामस्थांमार्फत आलेल्या भाविकभक्तांना व वारकऱ्यांना पिठले भाकरीचे जेवण दिले जाते. पालखीसाठी गावामध्ये नवीन रुंद रस्ता बनविण्यात आला आहे.
परंतु, गेल्या वर्षी गावात आलेली पालखी महामार्गावर नेऊन थांबविण्यात आल्याने वारकऱ्यांबरोबरच भाविकांचे व ग्रामस्थांचे मोठया प्रमाणावर हाल झाले. त्यामुळे पालखी सोहळा जून्या रुढी परंपरे प्रमाणे भांडगाव गावातील मुख्य चौकात भाविकांच्या दर्शनासाठी थांबविण्यात यावा. (Yavat News) अशी मागणी करणारे निवेदन दौंड विधानसभा मतदार संघ काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल दोरगे यांनी दौंडचे अतिरिक्त कारभार तहसीलदार अजित दिवटे यांच्याकडे दिले.
पालखी प्रमुख व प्रशासनाने भांडगाव ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करुन दखल घ्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. (Yavat News) याबाबतीत लवकरच पालखी सोहळा प्रमुख यांना देखील निवेदन देणार असल्याचे विठ्ठल दोरगे यांनी यावेळी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : बोरीभडक येथे डीजे वाजवल्या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Yavat News : चौफुला सुपा रस्त्यावर ट्रकची जबर धडक; एकाचा मृत्यू
Yavat News : सोने-चांदी लुटून फरार झालेल्या दरोडेखोरांच्या टोळीला यवत पोलिसांनी ठोकल्या बेड्या