Sunday, June 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : रस्त्यात वाहने टाकून पसार होणाऱ्यांसह मद्यधुंद चालकांवर गुन्हे दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 18 May 2026, 10:48

Yavat News यवत, ता. १८ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडी, अपघात आणि बेशिस्त वाहनचालकांवर अखेर यवत पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. आठवडी बाजाराच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विशेष वाहतूक मोहिमेदरम्यान महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर वाहने बेवारसपणे उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या चालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यासोबतच मद्यप्राशन करून दुचाकी चालवणाऱ्या चालकावरही थेट कारवाई करण्यात आली आहे. या धडक मोहिमेमुळे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. Yavat News

भाऊसो महादेव जाधव (रा. म्हसोबा चौक, यवत), सदाशिव तुकाराम गायकवाड (रा. भांडगाव, ता. दौंड), सिद्धार्थ रामचंद्र कदम (रा. भांडगाव, ता. दौंड) व रविंद्र बाळू फुले (रा. दुधाने चौक, यवत) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. Yavat News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार दिनेश शिवाजी पोळ, पोलीस हवालदार पी. आर. शिंदे आणि पोलीस अंमलदार ए. आर. जाधव हे यवत गावातील आठवडी बाजारामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक नियंत्रण आणि नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करत होते. यावेळी बिकानेर स्वीट होम समोरील सर्व्हिस रोडवर अनेक वाहने बेवारस अवस्थेत उभी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. Yavat News

 

पहिल्या कारवाईत टाटा मॅजिक (एमएच 42 के 0173) ही गाडी रस्त्याच्या मधोमध उभी करून चालक पसार झालेला आढळला. पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली असता चालक भाऊसो महादेव जाधव (रा. म्हसोबा चौक, यवत) असल्याचे समोर आले. वाहतुकीस अडथळा निर्माण करून मानवी जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी त्याच्यावर बीएनएस कलम २८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर काही वेळातच त्याच परिसरात दुसरी टाटा मॅजिक (एमएच 42 एमएफ 6150) ही गाडीही बेवारस अवस्थेत उभी असल्याचे दिसून आले. चौकशीत चालक सदाशिव तुकाराम गायकवाड (रा. भांडगाव, ता. दौंड) असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याच मोहिमेदरम्यान बजाज मॅक्सीमा रिक्षा (एमएच 12 डब्ल्यूआर 2603) रस्त्यावर धोकादायक पद्धतीने उभी करून चालक निघून गेल्याचे आढळून आले. संबंधित चालक सिद्धार्थ रामचंद्र कदम (रा. भांडगाव, ता. दौंड) याच्यावरही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, वाहतूक तपासणी सुरू असताना पोलिसांना एक दुचाकीस्वार वेडीवाकडी गाडी चालवत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली असता तो रविंद्र बाळू फुले (रा. दुधाने चौक, यवत) असल्याचे समोर आले. त्याच्या तोंडाला मद्याचा तीव्र वास येत असल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीत त्याने मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मोटार वाहन कायदा कलम १८५ अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे महामार्गावर वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, यवत पोलिसांकडून पुढील काळातही अशीच कठोर मोहीम राबवली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नराधमाला फासावर लटकवण्याची मागणी! नसरापूर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात; महिनाभरात निकाल लागण्याची शक्यता

Saturday, 13 June 2026, 20:57

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13
Next Post

Daund News : योगेश कोंडे कुठे आहे? म्हणत महिलेकडून मोटार रिवाइंडिंग दुकानात धुडगूस; दगडफेकीत कानगावातील युवक जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.