अजित जगताप
वडूज : माझी मैना गावावर राहिली,, माझ्या जीवाची होतीय काईली,, जग बदलुनी घाव, सांगून गेले आम्हा भिमराव, अशी शब्द रचना करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी खरी क्रांती घडवून आणली आहे. अशा शब्दात खटावचे गट विकास अधिकारी उदयसिंह साळुंखे यांनी सिद्धेश्वर कुरोली ता खटाव येथे झालेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मार्गदर्शन केले.
प्रारंभी युगपुरुषांच्या तसेच लोकशाहीर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. खटाव पंचायत समितीच्या वतीने वडूज येथील पंचायत समिती कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी गट विकास अधिकारी उदयसिंह साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता केंगारे, वरुड माजी सरपंच लालासाहेब माने व कर्मचारी वर्ग उपस्थित होते
साळुंखे पुढे म्हणाले, मार्क्स-लेनिन यांच्या तोडीची क्रांती व लेखन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी करून या देशातील, मातीतील विचार दिले. कविता, पोवाडा, नाट्य लेखन केले. त्यांच्या वारणेचा वाघ कादंबरीतून गावकुसाबाहेरील नायकांवर चित्रपट निर्मिती झाली होती.ते समाजसुधारक व क्रांतिकारक होते.
यावेळी सिद्धेश्वर कुरोली सरपंच सौ शीतल विवेक देशमुख, जेष्ठ पत्रकार धनंजय क्षिरसागर, अजित जगताप यांनी ही यावेळी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला खटावचे माजी सभापती संदीप मांडवे,सामाजिक कार्यकर्ते दत्ता केंगारे,लालासाहेब माने,माजी सरपंच राजू फडतरे,संतोष भंडारे,कार्यकर्ते नितीन देशमुख, आनंदा साठे, सतिश साठे, प्रताप देशमुख,सचिन साठे, आबाजी आवळे, शिवाजी साठे, प्रशांत फडतरे, विस्तार अधिकारी सोनावणे, ग्रामविकास अधिकारी सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी युवा उधोजक सोमनाथ साठे यांनी सूत्रसंचालन केले तर वैभव साठे यांनी आभार मानले.