Wonderful Wedding Story पुणे : घरची गरीबीची परिस्थीती, तुटपूंजी शेती त्यात दोन मुले दोन मुलगी असा जिंती ( ता. करमाळा ) येथील परिवार. वडील रमेश धेंडे यांनी मोठी मुलगी ज्योती हिचे लग्न करून जवळपास अठरा वर्षे झाली होती. (Wonderful Wedding Story) तिच्या पाठिवर असणारा भाऊ महेश मुकबधिर, दिव्यांग असल्याने त्याच्या लग्नाची नेहमीच आई वडीलांना बरोबर बहिनालाही काळजी लागली होती. महेशच लग्न होणार की नाही या चिंतेत असणारे या कुटूंबाला नातेवाईक मित्रमंडळाची साथ होती. अखेर अंपग असणाऱ्या ‘साक्षी’ ला मुकबधीर ‘महेश’ भेटला. नजरानजर झाली त्यातच दोघांच्या साक्षीने आयुष्य़ाच्या लग्नगाठी मंगल परीणयात जोडल्या गेल्या. (Wonderful Wedding Story)
सोलापूर जिल्ह्यातील जिंती ( ता. करमाळा ) येथे तुटपूंजी शेती करणारे शेतकरी रमेश धेंडे आपल्या पत्नीसह शेती व्यवसाय करतात. त्यांना दोन मुले आणि दोन मुलगी असा त्यांचा परिवार आहे. मोठी मुलगी ज्योती हिचे अठरा वर्षा पुर्वी रुई (ता.इंदापूर) येथे कांबळे कुटूंबाशी विवाह झाला होता. त्यानंतर मुलगा महेश हा तिचा भाऊ जन्मजात मुकबधिर आहे. तसेच त्याला सुव्यवस्थित चालता येत नाही.
महेशने मुकेपणा व अंपगत्वावर मात करत त्याने आठवी पर्यंतचे शिक्षण घेतले होते. घरची गरिबीची परिस्थीती त्यामुळे महेशला पुढील शिक्षण घेता आले नाही. तरीही महेशने जिद्द व चिकाटी सोडली नाही. आयुष्य जगण्यासाठी काहितरी व्यवसाय करायचा. यासाठी त्याने व्यवसायांबाबत मार्गदर्शन मिळवले. जिंती (ता. करमाळा) येथे कपडे इस्त्री, झेरॉक्स व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू दुरुस्त करण्याचे काम तो करू लागला.
कमी वेळेतच त्याच्या कष्टामुळे त्याच्या व्यवसायाला चांगली भरभराटी येऊ लागली. पण आयुष्यात साथीदाराची आवश्यकता असते. जीवनाच्या या गाडीला दुसरे चाक पत्नी म्हणून मिळावे. यासाठी तिच्या बहिनीची धडपड सुरू झाली. गरीब आई वडील मुलांच्या प्रपंचासाठी कष्ट उपसण्याची तयारी दाखवतात. पण योग्य जोडीदार मिळणे खूप जिकीरीचे झाले आहे. महेश चे लग्न जमावे यासाठी नातेवाईक मित्रमंडळी देखील कामाला लागले होते. त्यातून बहिनीला भावाच्या लग्नाची काळजी नेहमी सतवत असे.
” दिव्यांग मुकबधिरांचे मंगलमय जीवन” …!
एके दिवशी बहिण ज्योतीला नाव्ही (ता. इंदापूर) येथील दिव्यांग असणारी साक्षी घाडेगे हिची भेट घटली. मुकबधिर व दिव्यांग असणाऱ्या भाऊ महेश ची तीने ओळख करून दिले. नजरानजर झाली त्यातच दोघांच्या साक्षीने आयुष्य़ाच्या लग्नगाठी मंगल परीणयात जोडल्या गेल्या. कुटूंबातील प्रमुखांनी या ल्गनास मान्यता दिल्यावर रितीरिवाजाप्रमाणे हे अनोखे जोडपे बुधवारी (ता.२८) लग्नबंधनाच्या मंगल परिणयात जोडले गेले.
या वेळी टाकळीचे (ता.श्रीगोंदा) माजी सरपंच कोंडीबा रणसिंग, जिंतीचे ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय गायकवाड, पुणे प्राईम न्यूजचे उपसंपादक विशाल कदम, ह.भ.प.बलभीम पोटे, उद्योजक पटेल मुलाणी, अमोल रणसिंग, सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी मामा कदम, सामाजिक कार्यकर्ते संदीप जगताप, विनोद चव्हाण, किशोर धेंडे, प्रकाश धेंडे, सिद्धार्थ शिंदे, स्मिता जगताप, अनिता गायकवाड, काजल खरात, जयश्री साबळे, करुणा अब्दुले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.