Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भाडेकरूंची नोंद पोलीस स्टेशनला न केल्यास उरुळी कांचन पोलीस घरमालकांवर गुन्हे दाखल करणार?

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 2 May 2025, 12:41

उरुळी कांचन, (पुणे) : सामान्यांच्या सुरक्षिततेसाठी घरमालकांनी भाडेकरूंची नोंद पोलीस स्टेशनला करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते. खूप दिवस झाले मात्र काही घरमालकांनी भाडेकरूची माहिती पोलिसांना न दिल्याने लोणी काळभोर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे उरुळी कांचन पोलिसांकडून वारंवार भाडेकरूंची माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. मात्र नागरिक टाळाटाळ करींत आहेत. त्यामुळे उरुळी कांचन पोलीस लोणी काळभोर पोलीसांसारखे मालकांवर गुन्हे दाखल करणार का याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

पुणे – सोलापूर लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे- सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण, व दळणवळणाच्या वाढलेल्या सुविधांमुळे पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात आर्थिक उलाढालींचे प्रमाण वाढण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे या भागात परराज्यातून रोजीरोटीसाठी येणाऱ्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ होत असल्याने फसवणूक, गुन्हेगारी, मारामारी अशा प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

लोणी काळभोर व उरुळी कांचन परिसरात मोठ्या प्रमाणावर मोठ्या कंपन्या, नर्सरी व्यवसाय, छोटे-मोठे उद्योगधंदे, शौक्षणिक संस्था असल्याने या परीसरात मोठ्या प्रमाणात घरे भाड्याने दिली जातात. औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार तसेच मजूर व लहान लहान व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याबरोबर या परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीची लोकही राहतात. ते दिवसभर फिरून पहाणी करतात. रात्री दुचाकी चोरणे, घरफोडी, मोबाईल चोरीचे प्रकार करतात. त्यानंतर ते त्यांच्या राज्यात निघून जातात. ज्यावेळी त्यांना अटक होते. त्यावेळी या परिसरात तो भाडेतत्वावर राहत असल्याचे पुढे येते. यासाठी या परिसरातील नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन भाडेकरूंची चौकशी करणे आवश्यक आहे.

 

दरम्यान, मागील दीड ते दोन वर्षांपूर्वी हुबेहूब बनावट 500 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या एका आरोपीला सोलापूर स्थानिक गुन्हे (ग्रामीण) अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी उरुळी कांचन येथून ताब्यात घेतले होते. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत त्याने एक भाड्याने खोली घेतली होती. व याच भाड्याने घेतलेल्या खोलीत जवळपास 6 लाखांच्या बनावट नोटा छापल्या होत्या.

याबाबत बोलताना उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील म्हणाले, “उरुळी कांचन पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार भाडेतत्वावर असलेल्या नागरिकांची माहिती घरमालकांनी पोलिसांना द्यावी. कारवाई दरम्यान दोषी आढळनाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे घरमालकांनी पोलिसांना माहिती द्यावी. यासाठी पोलीस उपनिरीक्षक अनिल खोमणे, पोलीस हवालदार सुजाता भुजबळ, व पोलीस शिपाई ऋषिकेश रासकर यांच्याकडे घरमालकांनी माहिती द्यावी.”

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

कट्टर विरोधकांची जुळली ‘राजकीय’ मैत्री? पुण्यात रविंद्र धंगेकर आणि नाना भानगिरे एकाच मंचावर; चर्चांना उधाण

Thursday, 30 July 2026, 18:45

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना! कर्जमाफीच्या रकमेबाबत सरकारचे मोठे स्पष्टीकरण; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना

Thursday, 30 July 2026, 18:21

अनिल परबांना दिलासा! ‘त्या’ गाजलेल्या मारहाण प्रकरणातून अखेर निर्दोष मुक्तता; मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

Thursday, 30 July 2026, 18:12

लाडक्या बहिणींना धक्का! ‘या’ महिलांचा हप्ता बंद; तुमचं नाव यादीत आहे का?

Thursday, 30 July 2026, 17:54

पुणे-शिरूर मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आमदार माऊली आबा कटके आणि PMRDA आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांचा संयुक्त पाहणी दौरा

Thursday, 30 July 2026, 17:31

Uruli Kanchan News : शिंदवणे घाटात अज्ञातांकडून रात्रीच्या अंधारात कचऱ्याच्या गाड्या रिकाम्या; वनक्षेत्रासह पर्यावरण धोक्यात, तर दुर्गंधीने नागरिक हैराण..

Thursday, 30 July 2026, 17:19
Next Post

जयकुमार गोरे बदनामी प्रकरण ; रामराजे नाईक निंबाळकरांना समन्स, काय आहे कारण?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.