लहू चव्हाण
पाचगणी : कोरोनाच्या संकटामुळे तसेच अवकाळी पाऊस, बदलत्या वातावरणामुळे स्ट्रॉबेरी पीक धोक्यात आले आहे. स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला उच्यांकी बाजारभाव देण्यासाठी कंपन्याशी संपर्क करून बाजारपेठ उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही नितीन भिलारे यांनी दिली.
भिलार येथे श्रीराम फळ प्रक्रिया आणि भिलार ग्रामपंचायतिच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भिलारे बोलत होते. यावेळी सरपंच शिवाजी भिलारे, आनंदा भिलारे, अशोक भिलारे,बाजीराव भिलारे, विश्वनाथ भिलारे, पांडुरंग मोरे उपस्थित होते.
भिलारे म्हणाले, स्ट्रॉबेरी या पिकावरच महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवन अवलंबून आहे.एकीकडे बदलत्या हवामानामुळे हे पीक धोक्यात आले आहे. तर बाजारपेठेतील स्पर्धेमुळे योग्य भाव मिळत नाही .त्यामुळे तरुणवर्ग शेतीपासून दूर जात आहे . हे टाळण्यासाठी , स्ट्रॉबेरीला अधिक भाव मिळणे आवश्यक आहे . यासाठी श्रीराम फळप्रक्रिया संस्थेच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार आहे.
सुरुवातीला निर्यात होणाऱ्या स्ट्रॉबेरीचे पूजन करण्यात आले. त्यांनतर स्ट्रॉबेरी विक्रीसाठी पाठविण्यात आली.