Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दर रविवारी गाव-परिसर स्वच्छ करणाऱ्या स्वच्छ्ता अभियान ग्रुपच्या कार्याचा गौरव; लोणी भापकर तरुणांची कौतुकास्पद कामगीरी…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 27 November 2022, 17:16

हनुमंत चिकणे 

उरुळी कांचन : लोणी भापकर (ता. बारामती) येथील ग्राम स्वच्छता अभियान ग्रुपच्या कामाची दखल घेऊन सेवानिवृत्त क्राईम ब्रँच पुणेचे सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे व सेवानिवृत्त वरीष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांच्या हस्ते एक जीव सेवा संघ, बारामती सायकल कल्ब, सह्याद्री सोशल फाउंडेशन, सहास अडव्हेंचर बारामती यांच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन ग्रुपचा गौरव करण्यात आला आहे.

लोणी भापकर व पंचक्रोशीतील परिसर दर रविवारी दोन तास स्वच्छ करण्याचा निर्णय २ जानेवारी २०२२ रोजी ” स्वच्छता अभियान ग्रुप लोणी भापकर” यांनी केला होता. सामाजिक उत्तरदायित्व याचे भान ठेवून समाजासाठी काहीतरी करायचे हा हेतु समोर ठेवुन आपले गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्याची योजना त्यांचे समविचारी सहकारी यांच्यासमोर मांडली असता सर्वांनी त्यास संमती दिली.

 

याच माध्यमातून लोणी भापकर, पळशी, मासाळवाडी, सायंबाची वाडी या पंचक्रोशीतील परिसरामधील मुख्य मंदिरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हायस्कूल, मुख्य रस्ते, स्मशानभूमी, या ठिकाणची सार्वजनिक साफसफाई करून गावापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कार्याचे आजूबाजूच्या गावातील मंडळींही कौतुक करत आहेत.

आपले गाव ही आपलीच जबाबदारी आहे ही संकल्पना राबविण्याचे त्यांनी पक्के केले. आणि तरुणांना याची माहिती देण्यासाठी समाज माध्यमावर एक ग्रुप तयार करण्यात आला. त्यातून तरुणांना गावात स्वच्छता अभियान राबविण्याची माहिती दिली गेली.

स्वच्छता अभियान ग्रुपमध्ये रिटायर आर्मीचे जवान, पोलीस, शिक्षक, महसुल विभाग, इंजिनियर्स, महाराष्ट्र विद्युत बोर्ड, कंपनी, प्रगतशील व्यावसायिक, पंचायत समिती सदस्य, प्रगतशील शेतकरी, इतर क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक तसेच शिक्षण घेणारी मुले, यांनी सहभाग घेतला आहे. ग्रुपची स्थापन झाली त्यावेळी त्यामध्ये फक्त १५ सदस्य होते. ग्रुपचे कार्य पाहून ग्रुप व्याप्ती वाढत जाऊन आज ग्रुपमध्ये ७० सभासदकाम करीत आहेत.

दरम्यान हि संकल्पना लोणी भापकरचे रहिवासी व सध्या भिगवण पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे पोलीस नाईक सचिन पवार यांना सुचली. त्यांनी हा प्रस्ताव सर्वांसमोर मांडला असता सामाजिक उत्तरदायित्त्वाचे भान ठेवून सर्वांनी होकार दिला. व लोणी भापकर गाव व आजुबाजूच्या परीसरात स्वच्छता अभियान राबविण्यास सहमती दर्शवली. गावातील तरूणांनी एकत्र येऊन २ जानेवारी २०२२ रोजी सर्वानुमते या ग्रुपची स्थापना करून प्रत्यक्ष कामास सुरवात करण्यात आली. आतापर्यंत प्रत्येक रविवारी हे काम ग्रुप मधील सर्वजन करीत आहेत.

११ महिन्यात ग्रुपने केलेली कामे..!
लोणी भापकर व परिसरात वृक्षारोपण, स्वच्छता अभियान ग्रुप तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी भापकर येथे लहान मुलांच्या ग्राउंड वर मुरूम टाकून मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड तयार केले. स्थापना झाल्यापासून ४७ आठवडे दर रविवारी न चुकता दोन तास श्रमदान केले जाते.

इयत्ता दहावी व बारावी मध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थी यांचा सत्कार घेऊन त्यांना शिक्षणासाठी मदतचे साहित्य वाटप केले जाते. तसेचपुढील काळामध्ये शिक्षणासाठी मदत करण्याची ग्वाही देण्यात आलेली आहे.

रायगड व राजगड या किल्ल्यावर जाऊन स्वच्छता अभियान यशस्वीरित्या पार पाडले आहे. कोविड-१९ च्या काळात २०२० मध्ये संपूर्ण गावांमध्ये प्रत्येक कुटुंबाच्या दारोदारी भाजीपाला किट वाटप करण्यात आले होते. लोणी भापकर मधील एक लहान मुलास वैद्यकीय खर्चासाठी सर्वांनी मिळून मदत केलेली आहे.

 ग्रुपमध्ये सहभागी असलेले सदस्य

सचिन पवार, विजयकुमार गोलांडे, विजय पाटोळे, सचिन कांबळे, रवींद्र भापकर, सचिन भापकर, संदीप भापकर, दीपक गायकवाड, अविनाश गायकवाड, भानुदास भापकर, जयदीप भापकर, योगेश भापकर, विजय भापकर, गणेश भापकर, किरण भापकर, संकेत भापकर, मनोज वाघ, नंदकुमार मदने, गणेश भापकर, सचिन उर्फ पिंटू तात्या भापकर, प्रकाश भापकर, प्रवीण भापकर, राहुल भैया भापकर, राजू खलाटे, राजू मदने, अमोल मदने, ऋषिकेश भापकर, ऋतिक भापकर, अमर भापकर, संदीप गावडे, शरद भापकर, सुनील मोरे, हरिश्चंद्र दीक्षित, अभिजीत भापकर व लहान मुले असे एकूण ७० सभासद आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18
Next Post

पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात संविधानदिन उत्साहात साजरा..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.