Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“‘ताज हॉटेल उडवणार!’ दाऊदच्या नावाने धमकी, मुंबईत रातोरात हाय अलर्ट”

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 12 July 2026, 12:42

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील सुप्रसिद्ध ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने रविवारी मध्यरात्री पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली. “अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे,” असा खळबळजनक फोन आल्याने मध्यरात्री पोलीस प्रशासनात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र, तासाभराच्या कसून तपासणीनंतर हा फोन निव्वळ अफवा असल्याचं समोर आलं आहे. यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री सुमारे १२ वाजून १३ मिनिटांनी नवी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. फोनवरील व्यक्तीने “दाऊदने ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे,” अशी थेट माहिती दिली आणि फोन कट केला. प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन नवी मुंबई पोलिसांनी हा संदेश तत्काळ मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला फॉरवर्ड केला.

माहिती मिळताच दक्षिण मुंबईतील कोलाबा पोलीस, गुन्हे शाखा आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक तत्काळ ताज हॉटेलमध्ये दाखल झालं. मध्यरात्रीच हॉटेलमध्ये मोठी शोधमोहीम हाती घेण्यात आली. हॉटेलची मुख्य लॉबी, स्विमिंग पूल परिसर, विविध बॉलरूम्स, हॉल्स आणि रेस्टॉरंट्स, पार्किंग तळ, हॉटेलचा बाहेरील परिसर आणि इतर संवेदनशील ठिकाणांची कसून तपासणी करण्यात आली.

 

बराच वेळ चाललेल्या या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटकं आढळून आली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी ही धमकी फोल असल्याचं जाहीर केलं. धमकीचा फोन आल्यानंतर मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांनी तांत्रिक तपास वेगाने सुरू केला. तांत्रिक विश्लेषणावरून हा धमकीचा कॉल नवी मुंबईतील तुर्भे परिसरातून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी त्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे कॉल करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली आहे.

सध्या आरोपीचा माग काढण्यासाठी मुंबई पोलिसांचं पथक तुर्भे पोलिसांच्या मदतीने परिसरात छापे टाकत असून, या खोडसाळ प्रवृत्तीच्या आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे काही काळ ताज हॉटेल परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंडमध्ये उद्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’; अजित पवार जयंती आणि मुख्यमंत्र्यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष आयोजन

Thursday, 30 July 2026, 20:04

सोरतापवाडीत 30 लाखांच्या हायवा ट्रकसह चोरीची वाळू जप्त; ट्रक चालकाला अटक तर ट्रक मालक लोणी काळभोरचा, उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Thursday, 30 July 2026, 19:59

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात रंगणार साहित्यसम्राट डॉ. अण्णा भाऊ साठे यांचा १०६ वा जयंती महोत्सव

Thursday, 30 July 2026, 19:55

CJP आंदोलन प्रकरणात मोठा ट्विस्ट! आंदोलकांवरील गुन्ह्यांबाबत दिल्ली पोलिसांची स्पष्ट भूमिका, म्हणाले….

Thursday, 30 July 2026, 19:29

‘तुझे माझ्या बायकोसोबत..” संशयाचं भूत डोक्यात घुसलं अन् त्यानं मित्रालाच संपवलं! पोलीस तपास आणि हत्येचं सत्य कसं आलं समोर?

Thursday, 30 July 2026, 19:25

धनश्री लॉजवर पुन्हा पोलिसांचा छापा! देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; लॉज चालक जेरबंद, सात महिलांची सुटका

Thursday, 30 July 2026, 18:56
Next Post

पवार कुटुंबात सनई-चौघडे! रोहित पवारांनी शेअर केलेल्या पत्रिकेने वेधलं सर्वांचं लक्ष; नेमकं काय आहे खास?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.