Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भोर तालुक्यात कुष्ठरोग शोध मोहीम; 45 गावांत घरोघरी तपासणी, दुर्गम वस्त्यांवरही आरोग्य पथकांची नजर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 30 September 2026, 15:09

विशाल शिंदे 

नसरापूर: फोकस्ड लेप्रसी सर्वेक्षण (FLC) तसेच कुष्ठरोग सहवासितांच्या सर्वेक्षणांतर्गत भोर तालुक्यात १६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. मागील पाच वर्षांतील कुष्ठरोग रुग्णांच्या सहवासितांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यावर मोहिमेत विशेष भर देण्यात आला आहे.

भोरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके यांच्या सूचनेनुसार आणि प्राथमिक आरोग्य केंद्र नसरापूर येथील डॉ. मिलिंद अहिरे व डॉ. पद्मवीर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील ९ उपकेंद्रे आणि ४५ गावांमध्ये आरोग्य विभागाचे पथक घरोघरी भेट देऊन कुष्ठरोग सहवासितांची तपासणी करीत आहे.

आरोग्य सहाय्यक विजय पावरा व किशोर काळोखे यांच्या समन्वयातून तसेच आरोग्य सेवक आणि आशा स्वयंसेविकांच्या सहकार्याने सर्वेक्षण राबविण्यात येत आहे. हातवे बु., कापूरहोळ, कासुर्डी गुं. मा, शिवरे, केळवडे, वेळू, जांभळी, नसरापूर आणि देगाव आदी गावांमध्ये संबंधित आरोग्य सेवक कर्मचारी व आशा स्वयंसेविका नागरिकांपर्यंत पोहोचून तपासणी करीत आहेत.

 

अधिकाऱ्यांकडून मोहिमेची पाहणी

दरम्यान, ३० सप्टेंबर रोजी सहाय्यक संचालक कुष्ठरोग श्रीमती जयश्री साळुंखे, जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जयंत काळकुटे, तालुका कुष्ठरोग पर्यवेक्षक राहुल तुळसे व सुनील तांभट यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र नसरापूरला भेट देऊन सुरू असलेल्या सर्वेक्षणाची पाहणी केली. यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षणाची माहिती घेतली तसेच प्रत्यक्ष क्षेत्रातील कामाचा आढावा घेतला.

यानंतर अधिकाऱ्यांनी कासुर्डी गुं. मा. आणि चेलाडी येथील कातकरी वस्तीला भेट देऊन संशयितांची तपासणी केली. दुर्गम वस्तीतील नागरिकांपर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहोचून संशयित रुग्णांचा शोध घेण्याच्या दृष्टीने या भेटीला महत्त्व प्राप्त झाले.

लवकर निदानावर भर

कुष्ठरोगाचे वेळेत निदान झाल्यास उपचारामुळे आजारावर प्रभावी नियंत्रण मिळविता येते. त्यामुळे त्वचेवर संवेदना कमी झालेला डाग, हात-पायांना मुंग्या किंवा बधिरपणा, नसांमध्ये जाडी अथवा अन्य संशयास्पद लक्षणे आढळल्यास नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

३१ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत सहवासितांची तपासणी, संशयित रुग्णांचा शोध आणि आवश्यकतेनुसार पुढील वैद्यकीय कार्यवाही केली जाणार आहे. मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागाचे अधिकारी, आरोग्य सेवक आणि आशा स्वयंसेविका परिश्रम घेत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

डोळ्यात अन् तोंडात चटणी टाकली, नाक दाबून मारलं! जन्मदात्यानेच लेकीला संपवलं; पुण्यात खून करून मृतदेह साताऱ्यात फेकला, वडील अन् चुलत्याला अटक

Wednesday, 30 September 2026, 23:23

लोणी काळभोर येथील माळीमळा परिसरातील रेल्वे अंडरपासच्या कामाला अखेर सुरुवात; सनी काळभोरसह मान्यवरांचे ग्रामस्थांनी मानले आभार..

Wednesday, 30 September 2026, 23:11

महाराष्ट्राला बनवणार जगाचे ‘इनोव्हेशन हब’! नवी मुंबईत ३०० एकरवर भव्य ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिटी’ उभारली जाणार

Wednesday, 30 September 2026, 22:58

Ind Vs WI 2nd ODI : गुवाहाटीत डोळ्यांचे पारणे फेडणारा थरार! वन-डे सामन्यात भारताचा ऐतिहासिक विजय; एकाच सामन्यात मोडले तब्बल १० पेक्षा जास्त ऐतिहासिक विक्रम

Wednesday, 30 September 2026, 22:41

पुणेकरांसाठी मोठी बातमी! रखडलेला कात्रज-कोंढवा रस्ता मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेचे टार्गेट

Wednesday, 30 September 2026, 22:10

मुंबईसह राज्यभरात गरबा-दांडिया रद्द होणार? दुष्काळाच्या सावटाखाली गरबा-दांडियाचा मुद्दा तापला; मराठी एकीकरण समितीचा थेट विरोध

Wednesday, 30 September 2026, 21:05
Next Post

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा उलगडा; हत्येमागचं खरं कारण समोर, एक आरोपी अटकेत!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp