Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बाळाला घेऊन असहाय्य मैत्रीण… सियाने घेतला गैरफायदा? केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नेल आर्टिस्टचा धक्कादायक खुलासा!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 30 September 2026, 14:39

पुणे : पुण्यातील चर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिच्या साथीदाराने अत्यंत नियोजनबद्ध आणि थंड डोक्याने कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यानंतर आता एका नेल आर्टिस्ट मैत्रीणीनं धक्कादायक खुलासा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सियाने तिच्या एका नेल आर्टिस्ट मैत्रिणीचे फोटो तिच्या संमतीशिवाय चोरले आणि ‘माही जे’ या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते तयार केले. या बनावट खात्यावरून केतनशी संपर्क साधून “सियाच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तिला लोहगडावर सरप्राईज पार्टी देऊया,” असे आमिष त्याला दाखवण्यात आले. या बहाण्याने केतनला लोहगडावर बोलावून आरोपींनी त्याची निर्घृण हत्या केली.

ज्या वेळी हे बनावट खाते बनवले गेले, त्‍या वेळी त्‍या नेल आर्टिस्ट मैत्रिणीची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती. तिचा पती अंमली पदार्थ प्रकरणात तुरुंगात होता आणि लहान बाळाची संपूर्ण जबाबदारी तिच्यावरच होती. तिच्या या असहायतेचा फायदा घेत आरोपींनी तिला “तोंड बंद ठेव” अशी थेट धमकी दिली होती. बाळ पाठीशी असल्याने ती महिला सुरुवातीला प्रचंड घाबरली. परंतु, हत्येची बातमी समोर आल्यावर तिने आईशी चर्चा केली आणि पती तुरुंगातून बाहेर येताच थेट पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या या जबाबाने तपासाला अत्यंत महत्त्वाचा पुरावा मिळवून दिला.

केतनचे वडील विशाल अग्रावाल यांनी या प्रकरणात नवीन आणि खळबळजनक दावा केला आहे. सिया आणि तिचा साथीदार चेतन यांच्यात ‘हबी-वायफी’ अशा नात्याने संभाषण चालत होते आणि त्यांनी एकमेकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. हे दोघे आधीच विवाहित होते का, या दृष्टीने पोलीस सध्या सादर केलेल्या 5,300 पानांच्या दोषारोपपत्राच्या आधारे सखोल तपास करत आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा उलगडा; हत्येमागचं खरं कारण समोर, एक आरोपी अटकेत!

Wednesday, 30 September 2026, 15:11

भोर तालुक्यात कुष्ठरोग शोध मोहीम; 45 गावांत घरोघरी तपासणी, दुर्गम वस्त्यांवरही आरोग्य पथकांची नजर

Wednesday, 30 September 2026, 15:09

फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांवर शपथपत्रासोबत चुकीची कागदपत्रे जोडल्याचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

Wednesday, 30 September 2026, 15:01

बाळाला घेऊन असहाय्य मैत्रीण… सियाने घेतला गैरफायदा? केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नेल आर्टिस्टचा धक्कादायक खुलासा!

Wednesday, 30 September 2026, 14:39

शासकीय नोकरीसाठी परीक्षा नाही, वयातही सूट! माजी अग्निवीरांसाठी महाराष्ट्र सरकारने काय ठरवलं? वाचा

Wednesday, 30 September 2026, 14:37

पुण्यात थरार! ‘तू त्यांच्या गँगशी मैत्री का केली?’ म्हणत भररस्त्यात तरुणाला अडवलं; पिस्तूल रोखत बांबूने मारहाण, परिसरात दहशत…

Wednesday, 30 September 2026, 14:27
Next Post

फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांवर शपथपत्रासोबत चुकीची कागदपत्रे जोडल्याचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp