Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांवर शपथपत्रासोबत चुकीची कागदपत्रे जोडल्याचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 30 September 2026, 15:01

पुणे : फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संतोष सरोदे यांच्यासह २८ नगरसेवकांनी निवडणुकीदरम्यान शपथपत्रासोबत बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप करत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपालिका प्रशासन शाखेने नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीचा अहवाल सात दिवसांत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सामाजिक कार्यकर्ते नितीन ऊर्फ नीतेश गायकवाड यांनी ही तक्रार केली आहे. संबंधित नगरसेवकांनी निवडणूक लढवताना नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. संबंधित नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करून नवीन प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मात्र, तक्रारीतील आरोपांची सत्यता चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या पत्राच्या आधारे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपालिका प्रशासन शाखेने फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. तक्रारीसोबत संबंधित कागदपत्रे जोडण्यात आल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. तक्रारदाराने यापूर्वीही या प्रकरणासंदर्भात अनेक वेळा अर्ज केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

दरम्यान, काही नगरसेवकांनी निवडणूक लढवताना थकबाकी असतानाही थकबाकी नसल्याचा दाखला सादर केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. काही नगरसेवकांनी स्वतःचे घर असतानाही शपथपत्रात घर नसल्याचे नमूद केल्याचाही दावा करण्यात आला आहे. तसेच एका नगरसेवकाचे नाव दोन विधानसभा मतदारसंघांच्या मतदारयादीत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सर्व बाबींची पडताळणी करून चौकशीचा अहवाल विनाविलंब जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! वीज अपघातात जनावर दगावल्यास मिळणार ५० हजार रुपये भरपाई; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Wednesday, 30 September 2026, 15:35

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा उलगडा; हत्येमागचं खरं कारण समोर, एक आरोपी अटकेत!

Wednesday, 30 September 2026, 15:11

भोर तालुक्यात कुष्ठरोग शोध मोहीम; 45 गावांत घरोघरी तपासणी, दुर्गम वस्त्यांवरही आरोग्य पथकांची नजर

Wednesday, 30 September 2026, 15:09

फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांवर शपथपत्रासोबत चुकीची कागदपत्रे जोडल्याचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

Wednesday, 30 September 2026, 15:01

बाळाला घेऊन असहाय्य मैत्रीण… सियाने घेतला गैरफायदा? केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नेल आर्टिस्टचा धक्कादायक खुलासा!

Wednesday, 30 September 2026, 14:39

शासकीय नोकरीसाठी परीक्षा नाही, वयातही सूट! माजी अग्निवीरांसाठी महाराष्ट्र सरकारने काय ठरवलं? वाचा

Wednesday, 30 September 2026, 14:37
Next Post

भोर तालुक्यात कुष्ठरोग शोध मोहीम; 45 गावांत घरोघरी तपासणी, दुर्गम वस्त्यांवरही आरोग्य पथकांची नजर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp