Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शासकीय नोकरीसाठी परीक्षा नाही, वयातही सूट! माजी अग्निवीरांसाठी महाराष्ट्र सरकारने काय ठरवलं? वाचा

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 30 September 2026, 14:37

मुंबई: महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत माजी अग्निवीरांना राज्यातील गणवेशधारी गट-क पदांच्या भरतीमध्ये 10 टक्के समांतर आरक्षण देण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच त्यांना शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये सामावून घेण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या आरक्षणामुळे सामाजिक आरक्षणाच्या विद्यमान व्यवस्थेला धक्का न लावता माजी अग्निवीरांसाठी स्वतंत्र कप्पीकृत समांतर आरक्षणाची तरतूद केली जाणार आहे. गरज भासल्यास या आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार उच्चस्तरीय सचिव समितीला देण्यात आला आहे. हे आरक्षण केवळ महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या माजी अग्निवीरांना लागू असेल.

पोलीस, कारागृह, नागरी संरक्षण, गृहरक्षक दल, राज्य गुप्तवार्ता विभाग, राज्य उत्पादन शुल्क, वन विभाग आणि महानगरपालिकांमधील गणवेशधारी गट-क पदांवर माजी अग्निवीरांना संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे संबंधित भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेतून त्यांना पूर्ण सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अग्निपथ योजनेंतर्गत 4 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या अग्निवीरांना त्यांच्या लष्करी प्रशिक्षणाचा फायदा या भरतीत होणार आहे. शिस्त, नेतृत्वगुण, तांत्रिक कौशल्य आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा अनुभव लक्षात घेऊन त्यांच्यासाठी काही नियमांमध्ये सवलती दिल्या जाणार आहेत. वयोमर्यादा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), शारीरिक मानक चाचणी (PST), ज्येष्ठता, पदोन्नती, प्रशिक्षण आणि अनुभव याबाबतच्या सविस्तर अटी स्वतंत्र शासन निर्णयातून स्पष्ट केल्या जातील.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, माजी अग्निवीरांना पोलीस आणि त्यासंबंधित विविध सेवांमध्ये सामावून घेतले जाईल. त्यांना वयोमर्यादेत 4 वर्षांची सवलतही देण्यात येणार आहे. पदांची संख्या कमी पडल्यास अतिरिक्त पदे उपलब्ध करून देण्याचा विचार केला जाईल. कोस्टल सिक्युरिटीमध्येही माजी अग्निवीरांना विशेष संधी देण्याची माहिती त्यांनी दिली.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा उलगडा; हत्येमागचं खरं कारण समोर, एक आरोपी अटकेत!

Wednesday, 30 September 2026, 15:11

भोर तालुक्यात कुष्ठरोग शोध मोहीम; 45 गावांत घरोघरी तपासणी, दुर्गम वस्त्यांवरही आरोग्य पथकांची नजर

Wednesday, 30 September 2026, 15:09

फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांवर शपथपत्रासोबत चुकीची कागदपत्रे जोडल्याचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

Wednesday, 30 September 2026, 15:01

बाळाला घेऊन असहाय्य मैत्रीण… सियाने घेतला गैरफायदा? केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नेल आर्टिस्टचा धक्कादायक खुलासा!

Wednesday, 30 September 2026, 14:39

शासकीय नोकरीसाठी परीक्षा नाही, वयातही सूट! माजी अग्निवीरांसाठी महाराष्ट्र सरकारने काय ठरवलं? वाचा

Wednesday, 30 September 2026, 14:37

पुण्यात थरार! ‘तू त्यांच्या गँगशी मैत्री का केली?’ म्हणत भररस्त्यात तरुणाला अडवलं; पिस्तूल रोखत बांबूने मारहाण, परिसरात दहशत…

Wednesday, 30 September 2026, 14:27
Next Post

बाळाला घेऊन असहाय्य मैत्रीण… सियाने घेतला गैरफायदा? केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नेल आर्टिस्टचा धक्कादायक खुलासा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp