लहू चव्हाण
पाचगणी – पावसाच्या दिवसांत डोंगर कपारी व परिसरात विविध प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध होत असतात नैसर्गिक पद्धतीने उगवणाऱ्या या रानभाज्या आरोग्यासाठी पोषक असून रानभाज्या महात्सवामुळे शहरातील नागरिकांना रानभाज्यांची ओळख होणार आहे. असे प्रतिपादन पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी केले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा महाबळेश्वर मार्फत आझादि का अमृत महोत्सव या निमीत्ताने पाचगणी येथे रानभाजी महोत्सव उद्घाटन प्रसंगी दापकेकर बोलत होते
यावेळी तालुका कृषी अधिकारी सुनिल साळुंखे,प्रकल्प अधिकारी जगदाळे,मंडल कृषी अधिकारी नितीन पवार,भुपाल बुधावले,कृषी.परिवेषक दिपक बोरडे,मनोज पाटील, भिमराव राऊत, संतोष खोपडे, ए.के.चव्हाण कृषी सहाय्यक संतोष जगताप, आर.डी.शिंदे,रोहन निगडे,देशराज येवले,निलेश किरतकूडवे,रिपेश पाटील,आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक संजय पार्टे आदी मान्यवर उपस्थित होते.
दापकेकर पुढे म्हणाले की, भाज्यांवर रासायनिक खते आणि विषारी औषधांनी युक्त भडिमारामुळे जगभरातील लोकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. रानभाज्या पुर्णपणे नैसर्गिक असल्याने आरोग्यासाठी चांगला फायदा होतो.
यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना रानभाज्यांचे आरोग्य बाबत महत्व आणि भविष्यातील संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संखेने सहभागी होणेचे अवाहन करण्यात आले.उपस्थितांना रानभाजी माहिती पुस्तिकेचे व भाजीपाला मिनिकिट वाटप करण्यात आले.
दरम्यान, या महोत्सवात करटोली, चिवचिव, फॅशन फ्रूट,कुरडो, भालगा, भारंगी, आळू, चिघळ, वाटर ग्रास, केळी फूल या भाज्यांनी विशेष लक्ष वेधून घेतले. रानभाज्यांचे महत्त्व लक्षात घेता सेवन करण्याची गरज असल्याने नागरिकांसह पर्यटकांनी या महत्वाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी प्रगतशील शेतकरी विजयकुमार भिलारे, लक्ष्मण मालुसरे, विलास गुरव, महेंद्र पांगारे राजेंद्र दुधाणे आदी उपस्थित होते.