Weather News शिरूर : मृग नक्षत्रात पावसाने हुलकावणी दिली. ऐन उन्हाळ्यात अवकाळी हजेरी लावून शेतकरी वर्गाला त्रास देणारा पाऊस पावसाळ्यातही दडी लावून बसला आहे. (Weather News) जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यातही प्रखर सुर्यप्रकाशामुळे उष्णता कायम आहे. (Weather News) पावसाअभावी आतापर्यंत पेरणीची कामे रखडल्यामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. या पुढील काळात दमदार पाऊस झाला नाही तर खरीप हंगामाची पेरणी होईल की नाही याबाबत शेतकरी चिंता करू लागले आहे. (Weather News)
पावसाळा सुरू झाल्यावर संपुर्ण जून महिना कोरडा गेला आहे. उन्हाळ्यात पिके काढणीच्या काळात पाऊस झाल्याने या काळात शेतकऱ्याची धांदल उडाली असली तरी अवकाळी पडलेल्या या पावसाने नुकसान करून त्रास दिला आहे. आषाढी एकादशी नंतर गुरू पोर्णिमा झाली तरी देखील पाऊसाने हजेरी लावली नसल्याने शेतकरी व सर्वसामान्य माणूस चिंताग्रस्थ दिसू लागला आहे.
पुणे जिल्ह्यात खरीप हंगामात बाजरी व सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यातून वेगवेगळ्या कडधान्य शेतीत घेतले जाते. त्या करीता पावसाळा सुरू झाला की शेतीची मशागत करण्यात शेतकरी गुंतलेला पहावयास मिळतो. या काळात त्यांना जोरदार पावसाची अपेक्षा असते. आता जुलै महिण्याला सुरवात झाली तरी जोरदार पाऊस झाला नाही. मध्यतंरी झालेल्या दोन तीन दिवसाचा अपवाद वगळता जून महिन्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंता वाढली आहे.
या वर्षी अल निनोचा इफेक्ट चा मॅान्सूनवर परिणाम राहणार असल्याचे संकेत दिले होते. देशभरात सध्या मान्सूनचा व्याप वाढला आहे. त्या तुलनेत पुणे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण नगन्य आहे. त्यामुळे पेरणी योग्य पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. त्या मुळे यावर्षीच्या पावसाळ्यात चिंता कायम असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, हुतात्मा बाबू गेनू जलाशयात ( डिंभा धरणा) आता मृत साठा शिल्लक राहिला असून धरणातले पाणी संपत आल्याचे दिसून येत आहे. या पुढिल काळात पाऊस न झाल्यास धरण देखील कोरडे पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हुतात्मा बाबू गेनु जलाशय( डिंभे धरण):
आज सोमवार ता.३ जुलै सकाळी सहा वाजेपर्यंत ६.३७ टक्के पाणीसाठा झाला असून मागील वर्षी याच दिवशी धरणात ४.९३ टक्के इतका पाणी साठा शिल्लक होता.