ऑफिस काम असो इतर कोणत्याही ठिकाणी काम असो, माणूस कधी ना कधी रजा घेत असतोच. आजारपणं असलं तर लोक अचानक रजा घेतात. सध्या असाच सीक लिव्हबाबत सोशल मीडियावर असाच एक प्रकार व्हायरल होत आहे, ज्याबद्दल जाणून तुम्हीही चक्रावून जाल. सोशल मीडियावर सध्या एका चॅटिंगचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक कर्मचारी आजारी पडल्यावर आपल्या बॉसकडे सुट्टी मागतो. मात्र या कर्मचारीला बॉसने जे उत्तर दिलं, ये वाचून तुम्हाला धक्काच बसेल.
कोणती व्यक्ती कधी आजारी पडेल, याची कुणाला कल्पना नसते. यातच या कर्मचाऱ्याने आजारी पडल्यावर बॉसकडे सुट्टी मागतिली तर त्याच्या बॉसने त्याला विचारले की, तू सात दिवसआधी का नाही कळवलं? आता या कर्मचाऱ्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर त्याच्या बॉससोबत व्हॉट्सॲप चॅटिंगचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. सिक लिव्हसाठी सात दिवस अगोदर सुट्टी अप्लाय करण्याची कंपनीची ही पॉलिसी व्हायरल होत असून यावर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर काहींनी यावर मीम्स सुद्धा शेअर करण्यास सुरुवात केली आहे.
Reddit वर शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये शेअर केलेल्या चॅटिंगमध्ये दिसत आहे कि, कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला कळवले की, “माझी तब्येत बरी नसल्याने मी ऑफिसला येऊ शकणार नाही.” त्यावर बॉस विचारतो की, तर आज सिक लिव्ह घेशील का? यावर कर्मचारी उत्तर देतो, होय. यानंतर बॉसने उत्तर दिले, सीक लीव्ह किंवा कॅज्युअल लीव्ह घेण्यासाठी तुला किमान 7 दिवस अगोदर कळवावे लागेल.”