अजित जगताप
Waduj News : वडूज : माणसाच्या आयुष्यामध्ये प्रगतीसाठी पाया महत्वाचा असतो. शालेय जीवनामध्ये आलेला अनुभव हा आयुष्याच्या उभारण्यासाठी उपयुक्त ठरत असतो. त्यामुळे शालेय जीवनातील प्रसंग व आठवणी नेहमी प्रेरणादायक ठरतात. म्हणूनच २५ वर्षां नंतर एकत्र येण्याचे भाग्य लाभलेल्या विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा गौरवा सोबत शालेय आठवणींना उजाळा दिला. कुरोली ता. खटाव येथील शाळेत हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. (At Sri Siddheshwar Vidyalaya in Kuroli, school memories were brought to life with Gurujan)
२५ वर्षांनंतर एकत्र येत विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा
सध्या धावपळीच्या जीवनामध्ये व सोशल मीडियाच्या माध्यमातून जुन्या आठवणींना जतन करण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध झालेले आहे .त्याचा पुरेपूर फायदा घेऊन खटाव तालुक्यातील श्री सिद्धेश्वर कुरोली या गावातील विद्यार्थ्यांनी २५ वर्षानंतर एकत्र येऊन एक (Waduj News) सामाजिक एकीकरण केले. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ,,,, या न्यायाप्रमाणे प्रगतीसाठी एकमेकांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
प्रारंभी श्री सिद्धेश्वर विद्यालयाचे निर्माते बापूसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर शिंग फुकून व टाळ्याच्या कडकडाट घोषणाबाजीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला तात्कालीन मुख्याध्यापक गोसावी सर, एस एस देशमुख, जे. वाय .जाधव , रघुनाथ मोहिते, काळोखे, एस पी देशमुख , श्रीमती बोडरे , सौ लावंड आधी शिक्षक उपस्थित होते.
यावेळीला शालेय विद्यार्थिनी असलेल्या सीमा मोहिते, गीतांजली उपाध्ये, योगिता कोकीळ, त्याचप्रमाणे विकास माळी, राजू मांडवे, सचिन जाधव, नितीन देशमुख यांनी (Waduj News) आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देऊन सर्वजण एकत्र आल्याचे समाधान व्यक्त केले. सदरच्या कार्यक्रमासाठी थेट लंडन , जयपूर, हरिहरेश्वर,अहमदनगर, पुणे, मुंबई ,ठाणे ,पनवेल आदी शहरातून हे विद्यार्थी उपस्थित राहिले होते. आपल्या बालपणीच्या आठवणीने व प्रसंग ऐकून अनेकांना आपले आनंदाश्रू अनावर झाले होते.
सदरच्या कार्यक्रमाचे नियोजन माजी विद्यार्थी व श्री सिद्धेश्वर कुरोली गावचे माजी सरपंच राजू फडतरे, सिद्धनाथ देशमुख, संदीप बागल, निलेश देशमुख ,(Waduj News) रामेश्वरी लवंगारे कैलास मांडवे, संदीप बोबडे, नारायण कारंडे, प्रकाश कांबळे, शरद देशमुख, कृष्णात कारंडे यांनी अल्पावधीत केले होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक कालिदास जाधव तर सारिका देशमुख यांनी सूत्रसंचालन केले .खरं म्हणजे माहेरच्या आठवणीने पुन्हा एकदा या बाल विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणीत रमल्या . कौटुंबिक जबाबदारीतूनही वेळ काढून आलेल्या सर्वांचे स्वागत करण्यात आले. (Waduj News) या विद्यार्थिनी तसेच विद्यार्थ्यांमधील बदल हा खऱ्या अर्थाने शालेय जीवनातील मिळालेल्या अनुभवाची पोचपावती ठरली आहे.
या वेळेला गुरुजनांच्या सत्कार करताना विद्यार्थी व गुरुजनांचे असलेले नाते अधिक दृढ झाले. नेहमी असा कार्यक्रम करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपला बहुमूल्य वेळ द्यावा. यासाठी संपूर्ण योगदान देण्याची जबाबदारी सिद्धेश्वर कुरोली या ठिकाणी स्थायिक झालेल्या विद्यार्थ्यांनी दिली. सेल्फी व फोटोसेशन करण्यासाठी तसेच जुन्या आठवणीं जतन करण्यासाठी गुलमोहर झाडा भोवती फेटा बांधून घेण्यासाठी गर्दी करण्यात आली होती. (Waduj News) संस्थेच्या वतीने माजी विद्ार्थ्यांचे प्रतिनिधी व माजी सरपंच राजू फडतरे यांचा सत्कार करण्यात आला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Waduj News : सात महिला कुस्तीपटू शोषण विरोधात आरोपींना अटक करण्यासाठी वडूज नगरीत खेळाडूंचे निदर्शने
Waduj News : खटाव तहसीलदारांच्या प्रयत्नाने रस्त्याचा वाद सामोपचाराने मिटला