उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित, स्वामी विवेकानंद अकॅडमी विद्यालयात ‘ब्रम्हांड’ या संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती करण्याचे कार्य स्वामी विवेकानंद अकॅडमी विद्यालय नेहमीच करीत असते. स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा उत्तम प्रयत्न दिसून आला, असे गौरवोद्गार प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ, डॉ. सौ. रचना रावत यांनी काढले.
विविध ग्रह, तारे विश्वातील अनेक संकल्पनावर आधारित नर्सरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. तसेच विद्यार्थ्यांचे गायन, संगित वाद्य वाजवणे, तसेच कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचलन या कलागुणांचे विशेष कौतुक करण्यात आले.
डॉ. सौ. रावत पुढे म्हणाल्या, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व सुजाण सुसंस्कृत विद्यार्थी घडविण्यासाठी शाळेतून केले जाणारे प्रामाणिक प्रयत्न याची महिती आपल्या भाषणातून दिली. तसेच आजच्या धावपळीच्या युगात मुलांना इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे व वाईट सवयी यापासून दूर ठेऊन चांगले निरोगी आयुष्य कसे देता येईल याबद्दल पालकांना मार्गदर्शन केले.
दरम्यान, यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश कांचन, संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नाने व विद्यार्थ्यांच्या उस्फुर्त सहभागाने हा सोहळा स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या प्रांगणात उत्साहात पार पडला.