अहमदाबाद : जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेनचा रेकॉर्ड’वंदे भारत’ने तोडला आहे. तिने पिकअपच्या बाबतीत बुलेट ट्रेनला पछाडले आहे. ० ते १०० किमी वेग पकडण्यासाठी बुलेट ट्रेनला ५४ सेकंद लागतात. तर वंदे भारतने केवळ ५२ सेकंद घेतले आहे.
Vande Bharat Express – The Pride of ‘Make in India’ Vision, making trial runs between Ahmedabad – Mumbai – Ahmedabad.#VandeBharat
— Gujarat Information (@InfoGujarat) September 10, 2022
वंदे भारत रेल्वेच्या देशातील विविध भागात चाचण्या सुरू आहेत. अहमदाबाद ते मुंबई या मार्गावर शुक्रवारी चाचणी घेण्यात आली. त्यावेळी वंदे भारतने केवळ ५२ सेकंदांमध्ये ताशी १०० किमी एवढा वेग घेतला. बुलेट ट्रेनला यासाठी ५४.६ सेकंद लागतात.
वंदे भारत हि रेल्वे शुक्रवारी (ता.९) सकाळी सव्वासात वाजता अहमदाबादवरून निघाली. ती मुंबई सेंट्रलला दुपारी १२.१६ वाजता पोहचली. तिने हे अंतर केवळ ५ पाच तासांमध्ये कापले आहे. त्यामुळे या गाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
दरम्यान, जुन्या वंदे भारतचा वेग ताशी १६० किमी एवढा आहे. नव्या गाड्यांचा ताशी १८० किमी वेगवेगवेगळ्या रेल्वे विभागांमध्ये वंदे भारतच्या चाचण्या झाल्या. त्यावेळी ही गाडी ताशी १८० किमी एवढ्या वेगाने धावली.
अहमदबाद-मुंबई वंदे भारत… अहमदाबाद-मुंबई वंदे भारत रेल्वे लवकरच सुरू होणार आहे. ही गाडी ३० सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नवरात्रीच्या निमित्ताने ही भेट प्रवाशांना मिळू शकते.