अजित जगताप
Vaduj News : वडूज : १६ गावातील पिके पाण्याअभावी वाळू लागलेलीतालुक्याला नव संजीवनी देणारे कार्यकर्ते आहेत. परंतु, अलिकडे पक्षीय पातळीवर विचार थांबून पाण्याच्या प्रश्नाबाबत सर्वांनी एकत्र यावे. अशी माफक अपेक्षा सर्वसामान्य जनता करत आहे. औंध परिसरातील पाण्यासाठी लढतात गावे सोहळा पण , आता कोणी घालू नये श्रेय वादाचा खोडा,असा सूर उमटत आहेत. दरम्यान, रविवार दि. ११जून रोजी सकाळी अकरा वाजता राजकीय पक्ष विरहित ओंध येथील साई मंगल कार्यालय व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
दुष्काळी माण-खटाव तालुक्यातील पाणीप्रश्नावर एकत्र येण्याची गरज
माण- खटाव तालुक्याला नवसंजीवनी मिळावी हे दिव्य स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी राजकीय महत्वकांक्षा व इच्छाशक्ती तसेच वरिष्ठ अधिकारी वर्गाची साथ लाभणे गरजेचे आहे. सध्या उन्हाळा आला की मंत्रालयातील वार्तानुकूलित केबिनमध्ये बसून जलसाठा व त्याचे नियोजन केले जाते. (Vaduj News) पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात येते. वास्तविक पाहता उदाहरण द्यायचं झालं तर चालू वर्षी दिनांक २० जून रोजी पाण्याचं कसं वाटप होणार? हे सांगितले जाते. पण दि८ जून रोजी पाणी कसे द्यावे? याचे मात्र कोणतेही नियोजन केले जात नाही. हीच खूप मोठी शोकांतिका ठरलेली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःच धरणग्रस्त आहेत पिण्याच्या पाण्याची काय अवस्था होते किंवा शेतीला पाणी नसल्यामुळे धरणग्रस्तांची काय परवड होते ?याचा त्यांनी अनुभव घेतलेला आहे. अलीकडच्या काळात स्ट्रॉबेरी पीक घेऊन त्यांनी शेतकऱ्याचे जीवनमान किती उंचावलेले आहे. (Vaduj News) हे दाखवून दिले असले तरी दुसऱ्या बाजूला खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांची पाण्याविना काय अवस्था आहे? हे दाखवून दिले जात आहे. वस्तुस्थिती समजण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाणे गरजेचे आहे. औंध, वरुड नागाची कुमठे, गोसावीची वाडी, गोपुज, वाकळवाडी पळशी, खरशिंगे कारंडेवाडी ,गणेश वाडी, त्रिमूली लांडेवाडी, खबालवाडी, नांदोशी, जायगाव, अंभेरी या गावांना पाणी मिळावे. यासाठी खऱ्या अर्थाने मंत्रालय पातळीवर अनेकांनी लढा दिलेला आहे. हा लढा विसरू शकत नाही .
खरं म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघाचे तात्कालीन खासदार शरद पवार यांना साताऱ्यातील पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. साहेब, माढा मतदारसंघातील दुष्काळी भागाला पाणी कसे देणार? त्यावेळेला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले खरोखर जर पाऊस पडला नाही तर तुम्ही सांगा पाणी कुठून द्यायचे? त्यांनी वस्तूची ती मांडली. (Vaduj News) आत्ता सातारा जिल्ह्यात पाणी आहे .त्या पाण्याचे नियोजन जर केले तर दुष्काळी भागाला पाणी मिळू शकते. पण, श्रेयवाद आड येत आहे .जुन्या काळातील कर्तबगार लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य माणसाची नाळ असलेले दिवंगत बापूराव पाटील- माने व पाण्यासाठी लढा देणारे दत्ताभाऊ जगदाळे, संदिप काका इंगळे, राजाभाऊ देशमुख, प्रदिप गुजर, वसंत पवार, धनाजी आमले, दिवंगत बापूराव माने- पाटील यांच्यासारख्या वजनदार नेते होते व काही आहेत.
पण अलीकडच्या काळात काळात पक्षीय पातळीवरती विचार केला जातो. त्यामुळे सामुदायिक हितासाठी घेतलेल्या बैठकीला राजकीय स्वरूप येत असते. हे कुठेतरी थांबले पाहिजे? आज या १६ गावातील पिके पाण्याअभावी वाळू लागलेली आहे. (Vaduj News) शेतकऱ्यांनी कर्ज काढून बी बियाणे घेतलेले आहे. मशागत केली आहे. आज पाणीच नसल्यामुळे त्यांची अवस्था म्हणजे ‘तुमच्या वचनावर श्रद्धा होती, जशी शेतकऱ्यांची पिकावर असते पण, मध्येच असा उन्हाळा पडला, पिकासोबत माती देखील करपून गेली’ या कवितेची आठवण येऊ लागलेले आहे. देवाला भिकाऱ्यासमोर यायचे असेल तर भाकरीच्या रूपानेच यावे लागेल. तशा पद्धतीने या भागाचा विकास केला असे सांगायचं असेल तर पाणी हे द्यावेच लागेल .हे आता सांगण्यासाठी कुठल्याही सोशल मीडियातील कार्यकर्त्याची गरज नाही.
आतापर्यंत आश्वासनाचा पाऊस, श्रेय वादाचा गडगडात झाला. पण, प्रत्यक्षात मात्र पिक वाळून करपून गेलेले आहेत. शेतकऱ्यांना वाली राहिलेला नाही. तरी ही काहींचे गुणगान गात आहे. म्हणजे या भागातील शेतकऱ्याची क्रूर श्रेष्ठ आहे. अधिकारी वर्गाने सुद्धा कागदी घोडे नाचवून पाण्याचे नियोजन करण्यापेक्षा प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या बांधावर असणाऱ्या परिस्थितीचे भान ठेवावे. (Vaduj News) गेल्या काही वर्षापासून सोळा गावच्या पाणी प्रश्नाबाबत जनजागृती होते. चर्चा होते. बातम्यांची कात्रण काढून ठेवली जातात. नंतर मात्र त्याचा विसर पडतो. सध्या मान्सून रखडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा वेळेला पाण्यासाठी नवीन संघर्ष करावा लागत आहे. खरीप पिकाची हमी भावात घसघशीत वाढ झाल्याचे केंद्र सरकार जाहीर करते पण दुष्काळात पीकच निघाले नाही तर घसघसगशीत वाढ कुणासाठी असणार? याचा जाब विचारला जाणार आहे.
या बैठकीला या भागात ठिंबक सिंचन योजनेच्या अंमलबजावणीसाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून निवड करून सुमारे दोनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पुढे आली आहे. त्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निश्चितच विचार करावा अशी इच्छा स्थानिक पातळीवर व्यक्त केली जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Vaduj News : निष्क्रिय कर्मचाऱ्या विरोधात मान्यवरांनी वडूज नगरपंचायतीमध्ये अधिकाऱ्यांना विचारला जाब
Vaduj News : वडूज शेती उत्पादन बाजार समिती प्रायोगिक तत्त्वावर बांधणार गाळे..
Vaduj News : वडूज पोलिसांच्या तत्परतेने तीन अल्पवयीन मुली पुन्हा स्वगृही परतल्या