Saturday, April 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan : विधानपरिषदेत प्रदीप दादा कंद “आमदार”? महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावरून भावी आमदार म्हणून प्रदीप कंद यांचे नाव चर्चेत..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 16 April 2026, 19:10
Uruli Kanchan

Uruli Kanchan : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद यांच्या नावावर “हवेलीचे भावी आमदार” म्हणून विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर हवेली विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत समाधान शिबाराचे उदघाटन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोणीकंद (ता. हवेली) येथे नुकतेच पार पडले. यावेळी बावनकुळे बोलत होते. या कार्यक्रमात बोलत असल्याची सोशल मिडीयात एक रील व्हायरल होत आहे. त्यामुळे तर्कवितर्कांना आता उधाण आले आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका कार्यक्रमादरम्यान प्रदीप कंद यांच्या कार्याचा गौरव करत, त्यांच्यावर आगामी काळात मोठी जबाबदारी सोपवली जाईल असे संकेत दिले. या वक्तव्यामुळे प्रदीप कंद यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून वर्णी लागणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच बावनकुळेंसारख्या वजनदार नेत्याने पाठीवर शाबासकीची थाप टाकल्यामुळे भाजपच्या गोटात नवा उत्साह संचारला आहे.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष म्हणून प्रदीप कंद यांनी हवेली तालुका आणि पुणे जिल्ह्यात आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. त्यांच्या याच कामाची दखल घेत मंत्र्यांनी केलेल्या सूचक विधानामुळे त्यांना विधिमंडळात स्थान मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी ग्रामीण भागातील पाणी, शिक्षण आणि आरोग्याचे प्रश्न प्रभावीपणे हाताळले आहेत. पूर्व हवेलीतील ग्रामपंचायतींमध्ये त्यांचा शब्द महत्त्वाचा मानला जातो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

दरम्यान, बावनकुळे यांनी केलेल्या प्रदीप कंद यांच्या संभाव्य आमदारकीच्या वक्तव्यामुळे मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत. जर त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागली, तर हवेली तालुक्यातील भाजपची ताकद कित्येक पटीने वाढणार आहे. महसूल मंत्र्यांच्या या “मास्टरस्ट्रोक” मुळे विरोधकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post
TCS Case

TCS Case : 'इन कॅमेरा' सुनावणीत शफी शेखचा मारहाणीचा दावा! नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात कडक बंदोबस्त; पोलीस तपासाला वेग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.